कोल्हापुरात ज्ञानेश महाराव यांच्या विरोधात स्वामी भक्तांचा मोर्चा, निदर्शने
महाराव यांना तात्काळ अटक करण्याची मागणी
कोल्हापूर प्रतिनिधी
ठाणें- मुंबई येथे संभाजी ब्रिगेडने आयोजित केलेल्या कार्यक्रमात ज्ञानेश महाराव यांनी प्रभू श्रीराम आणि स्वामी समर्थ यांच्यावर केलेल्या टिपण्णीला स्वामी भक्तांमध्ये नाराजी पसरली असून आज कोल्हापूरात स्वामीभक्तांकडून निषेध मोर्चा काढण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आलेल्या या धडक मोर्चामध्ये स्वामीभक्तांनी ज्ञानेश महाराव आणि संभाजी ब्रिगेड यांचा निषेध करत त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.
[embedyt] https://www.youtube.com/watch?v=Jj0hKAv6W80[/embedyt]
काही दिवसांपुर्वी संभाजी ब्रिगेडचे अधिवेशन झाले. ठाणे- मुंबईमध्ये झालेल्या या अधिवेशनामध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबरोबर जेष्ठ पत्रकार ज्ञानेश महाराव हे सुद्धा उपस्थित होते.
यावेळी झालेल्या भाषणाममध्ये ज्ञानेश महाराव यांनी आपले विचार मांडताना स्वामी समर्थांवर टिपण्णी केली. त्याचबरोबर त्यांनी अभिनेत्री निवेदिता जोशी सराफ यांच्या बद्दल देखील आक्षेपार्ह विधान केले. महाराव यांनी केलेल्या टीकेमुळे स्वामी समर्थ भक्तांमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष पसरला. आज शुक्रवारी सकाळी ११.०० वाजता ऐतिहासिक दसरा चौकात सर्व स्वामी भक्तांच्यावतीने श्री स्वामी समर्थ महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर राजर्षी छत्रपती श्री शाहू महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून मोर्चाला प्रारंभ करण्यात आला.
व्हीनस कॉर्नर मार्गे मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात आला. यावेळी खासदार धैर्यशील माने यांनी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना ज्ञानेश महाराव यांच्यावर कारवाई करण्यात यावी, या मागणीचे निवेदन दिले.