Kolhapur News : डॉ. डी. वाय. पाटील पॉलिटेक्निकची बॅडमिंटनमध्ये विजेतेपदाची हॅट्रिक
01:55 PM Feb 28, 2026 IST | NEETA POTDAR
Advertisement
इंटर इंजिनिअरिंग डिप्लोमा स्टुडंट्स स्पोर्ट्स असोसिएशन अंतर्गत स्पर्धा
Advertisement
कोल्हापूर: येथील डॉ. डी. वाय. पाटील पॉलिटेक्निकच्या मुलांच्या संघाने पदविका विभागीय बॅडमिंटन स्पर्धेत विजेतेपदाची हॅट्ट्रिक साधली. सावंतवाडी येथे झालेल्या या स्पर्धेत कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा जिल्ह्यातील ११ संघ सहभागी झाले होते. या विजयी संघात अथर्व शिंदे, हेत छाभैय्या, तनिष्क यादव, मितेश पटेल, मेहुल पटेल यांचा समावेश आहे.
डॉ. डी. वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील यांच्या हस्ते आणि विश्वस्त ऋतुराज पाटील यांच्या उपस्थितीत या खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. अंतिम सामन्यात त्यांनी संजय घोडावत पॉलिटेक्निक या संघावर विजय मिळवला. आता हा संघ कोपरगाव येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी होणार आहे.
Advertisement
Advertisement