For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

तळाशील खाडीत आढळला बटू शुक्राणू व्हेल

05:28 PM Jan 24, 2025 IST | अनुजा कुडतरकर
तळाशील खाडीत आढळला बटू शुक्राणू व्हेल
Advertisement

स्थानिकांनी केले सुरक्षित रेस्क्यू ; महाराष्ट्रातील पहिली नोंद

Advertisement

मालवण : प्रतिनिधी 

व्हेल जातकुळीतील ड्वार्फ स्पर्म व्हेल ही अनोखी प्रजाती गुरुवारी मालवण येथील तळाशील खाडीत किनाऱ्याजवळ आढळून आली. या व्हेलला स्थानिकांनी सुरक्षितपणे रेस्क्यू करून खोल समुद्रात सोडून दिले आहे. जिवंत ड्वार्फ स्पर्म व्हेलला मच्छीमारांनी रेस्क्यू केल्याची महाराष्ट्राच्या किनाऱ्यावरील ही पहिलीच घटना मानली जात आहे. तळाशील येथील काही मच्छीमारांना दुपारच्या सुमारास बोटिंग करत असताना खाडी किनारी उथळ पाण्यात ड्वार्फ स्पर्म व्हेल आढळून आला. तात्काळ या व्हेलला रेस्क्यू करून सुरक्षितपणे तळाशील जवळील खोल समुद्रात सोडून देण्यात आले. ही एक सिंधुदुर्गच्या सागरी जैव विविधतेमधील दुर्मिळ घटना मानली जात असल्याचे या विषयातील तज्ञांनी यांनी सांगितले आहे.

Advertisement

बटू शुक्राणू व्हेल बहुतेक वेळा समुद्राच्या पृष्ठभागावर पडलेल्या स्थितीत आढळतात यामुळे ते गटाने तरंगत असल्यासारखे दिसतात. हे व्हेल सहसा दोन ते सात सदस्यांच्या कळपाने दिसतात..यापूर्वी विशाखापट्टणम येथील त्रिवेंद्रम मध्ये ड्वार्फ स्पर्म व्हेल जवळून जिवंत आढळल्याची नोंद आहे. त्यानंतर ही प्रजाती महाराष्ट्रच्या किनाऱ्यावर पहिल्यांदाच जिवंत आढळून आल्याने मालवण किनारपट्टीवरील या नोंदीला विशेष महत्त्व आहे. यापूर्वी गोव्या जवळ ही प्रजाती आढळून आली असून पश्चिम किनारपट्टीवर ड्वार्फ स्पर्म व्हेल चा अधिवास असणे ही सुखद बाब आहे. असल्याचे सागरी जीव शास्त्रज्ञ वर्धन पाटणकर यांनी सांगितले.

Advertisement
Tags :

.