For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बजाज ऑटोला 15 इलेक्ट्रीक वाहनांसाठी डीव्हीए प्रमाणपत्र

06:31 AM Aug 27, 2024 IST | Tarun Bharat Portal
बजाज ऑटोला 15 इलेक्ट्रीक वाहनांसाठी डीव्हीए प्रमाणपत्र
Advertisement

वृत्तसंस्था/ कोलकाता

Advertisement

अवजड मंत्रालयाने बजाज ऑटो या ऑटोमोबाईल क्षेत्रातील कंपनीला 15 इलेक्ट्रिक वाहनांसाठी डीव्हीए प्रमाणपत्र सादर केले आहे. यायोगे बजाज ऑटो वाहन क्षेत्रातील पहिली वहिली मूळ उपकरण निर्मिती कंपनी बनलेली आहे.

2024 पर्यंत मंत्रालयाने टाटा मोटर्स, महिंद्रा आणि महिंद्रा, ओला इलेक्ट्रिक, टीव्हीएस मोटर, आयशर मोटर्स आणि बजाज ऑटो सहित 6 कंपन्यांकडून सादर करण्यात आलेल्या 74 मॉडेलपैकी 50 मॉडेलला मंजुरी दिलेली आहे. इतर मॉडेलची पडताळणी सुरू असल्याचे मंत्रालयाने म्हटले आहे.

Advertisement

दिग्गज कंपन्यांचा अर्ज नाही

असं जरी असलं तरी ऑटो ओइएम (ओरीजनल इक्वीपमेंट मॅन्युफॅक्चरर्स)करिता पीएलआय योजनेकरता 20 कंपन्या पात्र आहेत. यातील 14 कंपन्यांनी डीव्हीए प्रमाणपत्र मिळवण्यासाठी अर्ज केलेला नाही. याचाच अर्थ असा होतो की यांच्याकडे भविष्यातील मॉडेलची तयारी नसावी. त्या नसणाऱ्या कंपन्यांमध्ये सुझुकी मोटर, अशोक लेलँड, फोर्ड इंडिया, हुंडाई मोटर इंडिया, किया इंडिया, पीसीए ऑटोमोबाइल इंडिया आणि पिनेकल मोबिलिटी सोल्युशन्स यांचा समावेश आहे. दुचाकी वाहनांच्या श्रेणीमध्ये हिरो मोटोकॉर्प जी विदा इलेक्ट्रिक स्कूटरची विक्री करते आणि पियाजियो व्हेईकल्स यांनीही अर्ज केला नसल्याचे समजते.

याच दरम्यान बजाजच्या चेतक ब्ल्यू मॉडेलसह 10 इलेक्ट्रिक स्कूटरसोबतच 5 इलेक्ट्रिक  तिचाकींना डीव्हीए प्रमाणपत्र मिळाले आहे. ओलाने आपल्या 5 वाहनांपैकी चारसाठी मंजुरी मिळवली आहे. टीव्हीएसने 5 पैकी 2 दुचाकींना मंजुरी मिळवली आहे. टीव्हीएस आयक्यूब आणि टीव्हीएस आयक्यूब स्मार्टएक्स नेक्टा यांना मंजुरी मिळाली आहे.

दुसरीकडे टाटा मोटर्सच्या 27 वाहनांपैकी 15 वाहनांना मंजुरी मिळाली आहे. यामध्ये टाटा टियागो, टीगोर, एस आणि टाटा स्टार बस, टाटा अल्ट्राअर्बन इलेक्ट्रिक बस यांचा समावेश आहे.

प्रमाणपत्रासाठी पात्रता

उत्पादन प्रोत्साहन सवलत म्हणजेच पीएलआय योजनेअंतर्गत मिळणारी सवलतीची रक्कम घेण्यासाठी डीव्हीए प्रमाणपत्र महत्त्वाचे ठरते. देशांतर्गत मूल्यामध्ये भर घालण्यासाठीचे हे महत्त्वाचे प्रमाणपत्र आहे. सदरचे प्रमाणपत्र कंपनीला मिळवायचे असल्यास आपल्या वाहनांमध्ये 50 पन्नास टक्के किंवा त्यापेक्षा जास्त सुट्या भागांचा वापर केला जात असल्याचे सिद्ध करावे लागते.

Advertisement
Tags :

.