क्रशर कॉरीच्या डस्टींगमुळे शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ
सोनुर्ली , वेत्ये येथील लागत्या काजू कलमांना फटका
न्हावेली /वार्ताहर
गेल्या काही वर्षांपासून सोनुर्ली वेत्ये सीमेवर क्रशर कॉरीच्या वाढत्या उत्खनन प्रक्रियेमुळे स्थानिक शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे.रोज होणाऱ्या डस्टिंगमुळे इथल्या लगतच्या आंबा काजू बागायतीच्या उत्पादन प्रक्रियेवर त्याचा परिणाम झाला आहे.वेळोवेळी सांगूनही क्रशर चालक कुठल्याही प्रकारे सहकार्य करत नाही. शेतकऱ्यांनी यासंदर्भात वेळोवेळी भरपाई देण्याची विंनती केली आहे.मात्र , झालेल्या नुकसानाची अद्यापही भरपाई मिळाली नसून शेतकरी हवालदिल झाले आहेत. कारण, या काजू बागेच्या उत्पन्नावर त्यांच्या कुटुंबाची उपजीविका चालते. वार्षिक होणाऱ्या उत्पन्नात त्याचं कुटुंब चालत असत अशातच रोज होणाऱ्या डस्टिंगमुळे काजू कलमांना आलेला मोहोर हा कोलमडून इथल्या संपूर्ण काजूबागेचे अतोनात नुकसान स्थानिक शेतकऱ्यांचे होत आहे.दरम्यान शासनाने यावर वेळीच उपाययोजना केली नाही तर थेट जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.