हवेतून गायब होतेय धूळ
पृथ्वीवर वाढणार उष्णता : 20 वर्षांमध्ये 10 टक्क्यांची घट
वातावरणात असलेल्या धुळीचे प्रमाण मागील 20 वर्षांमध्ये सुमारे 10 टक्के कमी झाले आहेस. अमेरिकेच्या युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया, लॉस एंजिलिस (यूसीएलए)च्या वैज्ञानिकांच्या नवया संशोधनात 2003-23 दरमयन धुळीत ही घट नोंद झाली आहे. वैज्ञानिकांनुसार धूळ कमी झाल्याने पृथ्वीपर्यंत पोहोचणारी सूर्याच्या उष्णतेत किंचित बदल होऊ शकतो.
हा बदल याकरता महत्त्वपूर्ण आहे कारण हवेत असलेली धूळ केवळ अस्वच्छता किंवा प्रदूषण नाही. धूळीचे अत्यंत छोटे कण सूर्याच्या काही किरणांना परत अंतराळात परावर्तित करतात. यामुळे पृथ्वीवर पोहोचणारी उष्णता काहीशी कमी होते. अशास्थितीत वातावरणातील धूळ घटल्याने या नैसर्गिक थंडपणाचा प्रभाव कमी होऊ शकतो. परंतु ग्लोबल वार्मिंगचे मुख्य कारण अद्यापही ग्रीनहाउस वायूंचे उत्सर्जन असल्याचे वैज्ञानिकांनी स्पष्ट केले आहे.
या संशोधनासाठी वैज्ञानिकांनी 2003-23 पर्यंतचा उपग्रहीय डाटा, जमिनीवर करण्यात आलेले मापन आणि एटमॉस्फेरिक मॉडेलचा वापर केला. संशोधनानुसार मागील दोन दशकांमध्ये धूळीचे प्रमाण घटले आहे, परंतु वैज्ञानिक यामागील नेमके कारण कोणते हे अद्याप शोधू शकलेले नाहीत.
वातावरणात पोहोचणाऱ्या धूळीचा मोठा हिस्सा वाळवंटी भागांमधून येतो. उत्तर आफ्रिकेतील सहारा आणि आशियातील गोबी वाळवंट याचे मोठे स्रोत आहेत. जोरदार वारे या भागांमधील मातीच्या अत्यंत सुक्ष्म कणांना हजारो किलोमीटर दूरपर्यंत वाहून नेतात. दरवर्षी सुमारे 200 कोटी टन धूळ आणि वाळू वातावरणात पोहोचते. याचा मोठा हिस्सा उत्तर आफ्रिका आणि मध्यपूर्वेच्या वाळवंटांमधून येतो. हवेसोबत हे कण इतर खंड आणि सागरांपर्यंत देखील पोहोचतात.
धूळीचे हे कण सूर्याच्य काही प्रकाशाला परावर्तित करत परत अंतराळात पोहोचवितात. यामुळे पृथ्वीच्या पृष्ठभागांपर्यंत पोहोचणारी सौरऊर्जा काहीशी कमी होते. याचमुळे धूळीचे प्रमाण कमी घटल्यावर या नैसर्गिक कुलिंगचा प्रभावही काहीसा कमी होऊ शकतो.

संशोधनाशी संबधित वैज्ञानिकांनुसार धुळीत आलेल्या घटीने मानवी हालचालींमुळे निर्माण होणाऱ्या उष्णतेत किंचित वाढ केली आहे. परंतु याचा प्रभाव ग्रीनहाउस गॅसेसमुळे होणाऱ्या उष्णतेच्या तुलनेत खूपच कमी आहे. म्हणजेच धूळीच्या कमतरतेला ग्लोबल वॉर्मिंगचे मुख्य कारण मानले जाऊ शकत नाही.
वातावरणातील धुळीचा प्रभाव केवळ तापमानावर पडत नाही. याचे कण समुद्र आणि जमिनीपर्यंत पोषक घटक पोहोचविण्यात मदत करतात. दुसरीकडे जेव्हा धूळ केवळ बर्फावर जमते, तेव्हा त्याच्या पृष्ठभागाची चमक कमी होते. यामुळे बर्फ सूर्याची ऊर्जा अधिक शोषू शकतो आणि त्याच्या वितळण्याचा वेग वाढू शकतो. वैज्ञानिकांनुसार कोरडी होणारी सरोवरे आणि जलाशय देखील धूळीचे नवे स्रोत ठरत आहेत. अमेरिकेतील साल्टन सी, ग्रेट सॉल्ट लेक आणि आशियातील अरल सागर याचे उदाहरण आहे.
2003-23 दरम्यान धूळीत ही घट का झाली असा सर्वात मोठा सवाल वैज्ञानिकांसमोर आहे. बदलते वारे, जमिनीची स्थिती आणि इतर पर्यावरणीय बदल याचे संभाव्य कारण असू शकते. परंतु वातावरणात धूळीचे प्रमाण अद्यापही औद्योगिक काळाच्या पूर्वीच्या स्तरापेक्षा अधिक आहे. याचमुळे वैज्ञानिक आता आगामी काळात हवामान बदलासोबत धूळीचा हा पॅटर्न कशाप्रकारे बदलू शकतो हे समजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत.
