महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

तपासणी करताना बॉम्बचा उल्लेख पडला महागात

12:05 PM Nov 16, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

दोघांना खावी लागली कोठडीची हवा : दाबोळी विमानतळावरील घटना

Advertisement

वास्को : विमानतळावर बॅगांची तपासणी करण्यात येत असताना करण्यात आलेला बॉम्बचा उल्लेख दोघा हवाई प्रवाशांना महागात पडला. दोघानाही पोलीस कोठडीची हवा ख्यावी लागली आहे. विशेष म्हणजे यात महिलेचा समावेश आहे. पोलीस त्यांचा अधिक तपास करीत आहेत. वास्कोचे पोलीस उपअधीक्षक सलीम शेख यांनी या संघटनेसंबंधी दिलेल्या माहितीनुसार ही घटना मंगळवारी मध्यरात्री पावणे बाराच्या सुमारास दाबोळी विमानतळावर घडली. गोव्यात फिरण्यासाठी आलेले मध्य प्रदेश व पश्चिम बंगालमधील एक महिला व पुरूष बंगळूरला प्रयाण करण्यासाठी मंगळवारी रात्री दाबोळी विमानतळावर दाखल झाले होते. विमानात चढण्यापूर्वी सामानांची तपासणी करताना महिलेने थट्टेनेचे या माणसाच्या म्हणजेच आपल्या सहकाऱ्याच्या बॅगेत बॉम्ब असल्याचा उल्लेख केला.

Advertisement

मात्र, सहज म्हणून तिने केलेला बॉम्बचा उल्लेख एवढा महाग पडेल याचा विचारही तिने केला नव्हता. बॉम्ब म्हणताच तेथील सुरक्षा रक्षकांना आपले कर्तव्य बजावावे लागेल. लगेच त्या दोघाही प्रवाशांना बाजुला करण्यात आले. त्यांच्या बॅगांची आणि सामानसुमानाची आणि त्यांचीही तपासणी करण्यात आली. एवढेच नव्हे तर, दाबोळी विमानतळावर सुरक्षा तपासणी सुरू करण्यात आली. बेंगळूरला उ•ाण करण्याच्या प्रतिक्षेत राहिलेल्या इंडिगोच्या विमानालाही तपासणीसाठी रोखण्यात आले. त्यामुळे विमानातील सर्वच प्रवाशी अडचणीत आले. सुरक्षा तपासणीत कुठे काहीही आक्षेपार्ह आढळून आले नाही. सुरक्षेची खात्री पटल्यानंतर बुधवारी सकाळी सहाच्या सुमारास या विमानाने उ•ाण केले. मात्र, त्या दोघाही हवाई प्रवाशांना रोखण्यात आले. इंडिगो एअरलाईन्सच्या स्थानिक व्यवस्थापकाने वास्को पोलीस स्थानकात त्यांच्याविरूध्द तक्रार दिली. त्यामुळे त्यांना अटक करून पोलीस कोठडीत ठेवण्यात आले. त्या दोघाही हवाई प्रवाशांनी सुरक्षा रक्षकाला घाबरवण्याचा प्रयत्न केल्याचा आारोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article