For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

दुर्गापूर-मुंबई विमानाचे रायपूरमध्ये इमर्जन्सी लँडिंग

07:00 AM Oct 11, 2025 IST | Tarun Bharat Portal
दुर्गापूर मुंबई विमानाचे रायपूरमध्ये इमर्जन्सी लँडिंग
Advertisement

रायपूर : पश्चिम बंगालच्या वर्धमान येथील रहिवासी आणि कॅन्सरने ग्रस्त युवकाची दुर्गापूर-मुंबई  इंडिगो फ्लाइटमध्ये प्रकृती बिघडली होते. हा युवक उपचारासाठी मुंबई येथे जात होता. विमानातील सीटवरून तो बेशुद्ध होत कोसळला होता, ज्यानंतर रायपूरच्या विमानतळावर विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करावे लागले आहे. या युवकाला प्रथम रायपूर येथील रुग्णालयात नेण्यात आले, परंतु तेथे पोहोचण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. पश्चिम बंगालचा रहिवासी असलेला गौतम बाउडी हा ब्लड कॅन्सरने ग्रस्त होता. उपचारासाठी तो मुंबईतील टाटा मेमोरियल रुग्णालयात जाणार होता, परंतु विमानातच त्याची प्रकृती बिघडली आणि तो बेशुद्ध पडला होता. या घटनेनंतर वैमानिकाने हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाशी संपर्क साधत इमर्जन्सी लँडिंगची अनुमती मागितली. अनुमती मिळताच विमान रायपूर विमानतळावर लँड झाले आहे. विमानतळावर युवकाची तपासणी करण्यात आली, जेथे त्याला मृत घोषित करण्यात आले.

Advertisement

Advertisement
Tags :

.