महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

दुर्गामाता दौडला उत्साहात प्रारंभ

12:00 PM Oct 04, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

गल्लोगल्ली जल्लोषात स्वागत : विविध स्फूर्तीगीतांनी चैतन्यमय वातावरण

Advertisement

बेळगाव : देव, देश आणि धर्माच्या रक्षणासाठी चाललेल्या दुर्गामाता दौडला गुरुवारपासून शहरात उत्साहात प्रारंभ झाला. शिवाजी उद्यानातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची पुष्पहार घालून विधिवत पूजा करण्यात आली. छत्रे गुरुजी यासह मान्यवरांच्या हस्ते ध्वज चढवून दौडला चालना देण्यात आली.पहिल्या दिवशी शास्त्राrनगर, महाद्वार रोड, समर्थनगर आदी भागात दौड उत्साहात मार्गस्थ झाली. भगव्या पताका, भगवे ध्वज आणि भगव्या फेट्यांमुळे परिसर भगवेमय झाला होता. गल्लोगल्ली रांगोळ्या, झेंडे आणि पुष्पवृष्टी करून दौडचे उत्साहात स्वागत करण्यात आले. जागोजागी महिलांनी औक्षण केले. दौड दरम्यान शिवाजी महाराज की जय, धर्मवीर संभाजी महाराज की जय यासह धर्मासाठी झुंझायचे, देशासाठी मरायचे अशा स्फूर्ती गीतांनी चैतन्यमय वातावरण निर्माण झाले. पहिल्या दिवशीच्या दौडमध्ये आबालवृद्धांसह साऱ्यांचाच सहभाग मोठा होता. दौड मार्गावर शिवपुतळे ठेवून जागोजागी स्वागत झाले. शिवाय या शिवपुतळ्यांचे पूजनही केले. त्याबरोबर चेतना जागवणाऱ्या दौडीबाबत शिवरायांचे देखावेही सादर केले. विशेषत: शास्त्राrनगर परिसरात रस्त्यावर फुलांची रांगोळी घातली होती. त्यामुळे परिसर आकर्षून गेला होता.

Advertisement

पेपर फटाक्यांची आतषबाजी

शास्त्राrनगर परिसरात पेपर फटाक्यांची आतषबाजी करून जल्लोषी स्वागत करण्यात आले. अलीकडे पेपर फटाक्यांची क्रेझ वाढली आहे. त्याची झलक दौड मार्गावर पहावयास मिळाली. पुढील नऊ दिवस दौड चालणार असली तरी पहिल्या दिवसापासूनच धारकऱ्यांमध्ये अमाप उत्साह दिसून आला. शिवाजी उद्यानापासून सुरू झालेली दौड हुलबत्ते कॉलनी, महात्मा फुले रोड, एसपीएम रोड, संतसेना रोड, पाटीदार भवन रोड, शास्त्राrनगर, गुड्सशेड रोड, कपिलेश्वर कॉलनी, शास्त्राrनगर, आठल्ये रोड, महाद्वार रोड क्रॉस नं. 4, माणिकबाग रोड, समर्थनगर, महाद्वार रोड क्रॉस नं. 3 व 2, संभाजी गल्ली, एसपीएम रोड मार्गे कपिलेश्वर मंदिर येथे पोहोचली. यावेळी प्रांतप्रमुख किरण गावडे यांनी दौडीला उपस्थित असलेल्या शिवभक्तांना मार्गदर्शन केले. कपिलेश्वर मंदिरमध्ये आरती आणि ध्येयमंत्र झाल्यानंतर खडेबाजार पोलीस स्थानकाचे पीएसआय आनंद अडगूळ, मार्केट पोलीस स्थानकाचे पीएसआय महांतेश मठपती व माळमारुती पोलीस स्थानकाचे पीएसआय होन्नाप्पा तळवार आदींच्या हस्ते ध्वज उतरवून पहिल्या दिवशीच्या दौडची सांगता करण्यात आली.

शहापूर विभागाची आज बैठक

शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, शहापूर विभागाची शुक्रवार दि. 4 रोजी रात्री 8 वाजता बैठक बोलावण्यात आली आहे. लक्ष्मी रोड, शहापूर महागणपती देवस्थान येथे ही बैठक होणार आहे.

शनिवार दि. 5 ऑक्टोबर रोजीचा दौडचा मार्ग

श्री गणेश मंदिर चन्नम्मा सर्कल येथून प्रारंभ होणार आहे. काकतीवेस रोड, खडक गल्ली, कोर्ट, चव्हाट गल्ली, पी. बी. रोड, आरटीओ सर्कल, शिवाजीनगर, फोर्ट रोड, गांधीनगर मार्गे किल्ला येथील श्री दुर्गामाता मंदिरात सांगता होणार आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article