For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

खानापूरसह तालुक्यात उद्यापासून दुर्गादौड

11:04 AM Oct 02, 2024 IST | Tarun Bharat Portal
खानापूरसह तालुक्यात उद्यापासून दुर्गादौड
Advertisement

दररोज पहाटे 5.30 वाजता स्मारकातून दौडला प्रारंभ : शहरातील विविध मार्गांवऊन दौडीचे नियोजन : युवावर्गात चैतन्य, दौडीचे होणार भव्य स्वागत 

Advertisement

खानापूर : खानापूर शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात नवरात्र उत्सवानिमित्त शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे दुर्गामाता दौडीचे गुरुवार दि. 3 ते शनिवार दि. 12 ऑक्टोबरपर्यंत आयोजन करण्यात आले आहे. शहरासह ग्रामीण भागात दुर्गामाता दौड मोठ्या उत्साहात काढण्यात येते. शिवप्रतिष्ठानचे कार्यकर्ते दुर्गादौडीच्या तयारीला लागले आहेत. शिवस्मारक येथील शिवपुतळ्याला अभिषेक व पूजनानंतर दौडला दररोज पहाटे 5.30 वाजता सुरुवात होऊन 7.30 वाजता सांगता होणार आहे. शहरात येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून दौडला सुरुवात होणार आहे.

गुरुवार दि. 3 रोजी

Advertisement

श्री शिवस्मारक, निंगापूर गल्ली, लक्ष्मी मंदिर, चिरमुरकर गल्ली, कडोलकर गल्ली, पेंचापूर गल्ली, चौराशी मंदिर, पारिश्वाड क्रॉस, दादोबानगर, बाजारपेठ, संभाजी महाराज स्मारक, घाडी गल्ली, गुरव गल्ली, बस्ती गल्ली, कलमेश्वर मंदिर,  सातेरी माउली मंदिरात सांगता होईल.

शुक्रवार 4 रोजी

शिवस्मारक, मिशनरी कंपाऊंड, मारुती मंदिर (रेल्वेस्टेशन), मन्सापूर जुना रोड मन्सापूर, रामलिंग मंदिर, असोगा येथे समाप्ती.

शनिवार दि. 5 रोजी 

शिवस्मारक, न्यू निंगापूर गल्ली, नागलिंगनकर नगर, घोडे गल्ली, लक्ष्मी नारायण मंदिर, स्वामी समर्थ केंद्र, दत्त मंदिर, अर्बन बँक, दुर्गादेवी-श्रीराम मंदिर, भट गल्ली, हरीबोल मंदिर, पंचमुखी महादेव मंदिर, विठ्ठलदेव गल्ली, बेंद्रे खुट्ट, जुना बसस्टँड रोड, बालाजी मंदिर, मारुतीनगर, मारुती मंदिर येथे समाप्ती.

रविवार दि. 6 रोजी

शिवस्मारक, स्टेशनरोड, चिरमुरकर गल्ली, बेंद्रे खुट्ट, बाजारपेठ, पारिश्वाड क्रॉस, हायवे (हत्तरगुंजी रोड), कलमेश्वर कॉलनी रोड, अयोध्यानगर रोड, फुलेवाडी, हत्तरगुंजी, चाळोबा मंदिर, मुडेवाडी येथे सांगता.

सोमवार दि. 7 रोजी 

शिवस्मारक, गणपती मंदिर हायवे, विद्यानगर, शाहूनगर, रेल्वे स्टेशन रोड, गव्हर्न्मेंट हॉस्पिटल, स्टेशन रोड, चिरमुरकर गल्ली, बेंद्रे खुट्ट, गुरव गल्ली, घाडी गल्ली, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज स्मारक, बसवेश्वर मंदिर, बाजारेपठ, नगारखाना, रवळनाथ मंदिरात सांगता होईल.

मंगळवार दि. 8 रोजी 

शिवस्मारक, आश्रय कॉलनी, वर्दे कॉलनी, श्री बसवेश्वर स्मारक, जांबोटी क्रॉस, शिवाजीनगर, समर्थनगर, विठ्ठल रखुमाई मंदिर हलकर्णी, हुडको कॉलनी, नाग मंदिर,  दुर्गादेवी मंदिर, गांधीनगर, मऱ्यामा मंदिरात समाप्ती.

बुधवार दि. 9 रोजी 

शिवस्मारक, बुरुड गल्ली, लक्ष्मीनगर, न्यू नाईक गल्ली, समादेवी गल्ली, शिव मंदिर (हिरेमठ), होसमणी गल्ली, कडोलकर गल्ली, केंचापूर गल्ली, गणपती मंदिर, वाल्मिकी महाराज, पारिश्वाड रोड, बाजारपेठ, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज स्मारक, लक्ष्मी गदगा, रविवार पेठ, चौराशी मंदिर येथे सांगता होणार आहे.

गुरुवार दि. 10 रोजी

श्री शिवस्मारक, निंगापूर गल्ली, घोडे गल्ली, देसाई गल्ली, विठ्ठल मंदिर, बेंद्रे खुट्ट, चिरमुरकर गल्ली, स्टेशन रोड, श्री मंदिर समाप्ती.

शुक्रवार दि. 11 रोजी 

शिवस्मारक, पोलीस क्वॉर्टर्स, दुर्गानगर केएसआरपी रोड, वाजपेयीनगर, दुर्गादेवी मंदिर समाप्ती.

शनिवार दि. 12 रोजी 

शिवस्मारक, स्टेशन रोड, चिरमुरकर गल्ली, बेंद्रे खुट, जुना बसस्टँड रोड, जुना कुप्पटगिरी रोड, विठ्ठल-रुक्मिणी मंदिर कुप्पटगिरी येथे दौडची सांगता होईल. दुर्गादौडला रोज पहाटे 5.30 वाजता येथील श्री शिवस्मारक येथून सुरुवात होणार आहे. तरी शहर व परिसरातील शिवभक्त व धारकऱ्यांनी दौडीमध्ये बहुसंख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन शिवप्रतिष्ठानतर्फे केले आहे.

Advertisement
Tags :

.