महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

खानापूर तालुक्यात दुर्गा दौडला उत्साहात सुरूवात

11:47 AM Oct 04, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मंदिरांमध्ये घटस्थापना करून विशेष पूजा : नऊ दिवस विविध धार्मिक-दांडिया कार्यक्रमांचे आयोजन

Advertisement

खानापूर : येथील शिवप्रतिष्ठान हिंदूस्थानच्यावतीने नवरात्रीनिमित्त काढण्यात येत असलेल्या दुर्गा दौडीला गुरुवारी अत्यंत उत्साहात प्रारंभ झाला. पहिल्याच दिवशी दुर्गा दौडीला युवा-युवतीकडून मोठा प्रतिसाद लाभला. दुर्गामाता दौडीची गुरुवारपासून सुऊवात झाली. पहाटे 5.30 वाजता शिवस्मारक येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला रवि काडगी आणि मऱ्याप्पा पाटील यांच्या हस्ते अभिषेक व पूजा करण्यात आली. यानंतर दौड शिवरायांचा जय जय कार तसेच प्रेरणा गीते म्हणत श्री शिवस्मारक, निंगापूर गल्ली, श्री लक्ष्मी मंदिर, चिरमुरकर गल्ली, कडोलकर गल्ली, पेंचापूर गल्ली, श्री चौराशी मंदिर, पारिश्वाड क्रॉस, दादोबानगर, बाजारपेठ, श्री संभाजी महाराज स्मारक, घाडी गल्ली, गुरव गल्ली, बस्ती गल्ली, श्री कलमेश्वर मंदिर, श्री सातेरी माऊली मंदिरात आरती होऊन सांगता करण्यात आली.

Advertisement

शहरात सर्व मंदिरातून नवरात्रीनिमित्त विशेष पूजा बांधण्यात आली आहे. तसेच सर्व मंदिरावर आकर्षक विद्युतरोषणाई करण्यात आली आहे. शहरातील ग्रामदैवत असलेल्या महालक्ष्मी मंदिरात घटस्थापना करण्यात आली आहे. यानिमित्त देवीची विशेष पूजा करण्यात आली आहे. शहरात अर्बन बँक चौकात दुर्गा देवीची स्थापना दुपारी मोठ्या उत्साहात करण्यात आली. तसेच हलकर्णी येथेही दुर्गामाता मंदिरात घटस्थापना करुन विशेष पूजा करण्यात आली आहे. हलकर्णी येथे नवरात्रीनिमित्त दांडियाचे आयोजन करण्यात आले असून यासाठी मऱ्याम्मा मंदिरासमोर दांडियाचे आयोजन करण्यात येणार आहे. त्याची तयारी अंतिम स्वरुपात आली असून आजपासून या ठिकाणी दांडियाचे आयोजन होणार आहे. तसेच रवळनाथ मंदिरातही नवरात्रीनिमित्त नऊ दिवस वेशेष पूजा करण्यात येणार आहे. दसऱ्या दिवशी मूर्तीवर चांदीच्या मूर्तीचे आवरण करण्यात येते. शहरासह तालुक्यातील पुढील नऊ दिवस नवरात्रोत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.

जांबोटी

तालुक्याच्या पश्चिम भागातील जांबोटी-कणकुंबी भागात नवरात्रोत्सवानिमित्त श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान रामापूर पेठ, जांबोटी यांच्यावतीने गुरुवारपासून श्री दुर्गामाता दौडीला प्रारंभ झाला आहे. श्री दुर्गामाता दौडीच्या पहिल्या दिवसाची सुरुवात जांबोटी बसस्थानकावरील शिव स्मारकापासून करण्यात आली. गुरुवारी पहाटे 6 वा. बसस्थानकावरील श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिषेक व पूजन करण्यात आले. त्यानंतर भगवा ध्वज व शस्त्रांची पूजा करण्यात आली. त्यानंतर श्री दुर्गामाता दौडीला सुरुवात होऊन गांधीनगर, पारवडकर गल्ली, भट गल्ली, श्री राम मंदिर, शिवस्मारक बसस्टँड येथे शिवगर्जना आरती करून आजच्या दिवसाची सांगता झाली.

खैरवाड

नवरात्रीनिमित्त खैरवाड ता. खानापूर येथे दुर्गा दौडीचे आयोजन करण्यात आले आहे. खैरवाड येथील छत्रपती शिवाजी राजांच्या स्मारकापासून दौडीला सुरवात झाली. त्यानंतर गावातील विविध गल्ल्यातून फिरुन दौडीची सांगता झाली. यात युवक, युवतीसह जनतेचा मोठा सहभाग होता. खैरवाड येथे दोन वर्षापूर्वी गावच्या मध्यभागी छत्रपती शिवाजी राजांचे भव्य स्मारक बांधण्यात आले आहे. या ठिकाणी रोज पहाटे 6 वाजता गावातील प्रत्येक कुटुंबाकडून एका दिवशी छत्रपतींची पूजा करण्यात येते. दुर्गामाता दौडीच्या निमित्ताने गावात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. आता रोज दुर्गामाता दौड काढण्यात येणार आहे.

नंदगड 

नंदगड येथे दौडची सुरुवात सर्वप्रथम पहाटे 5.30 वाजता ग्रामदेवता श्री लक्ष्मीदेवी मंदिरमध्ये महाआरती कार्यक्रम झाल्यानंतर मंदिराच्यासमोर हजारो धारकऱ्यांच्यावतीने आरती, सनातन ध्वजाला वंदना देऊन शिवगर्जना घोषणा, ध्येय मंत्र, शिवमय वातावरणात  सुरुवात केली जाते. दुर्गामाता दौडचे स्वागत करण्यासाठी गल्लोगल्ली रांगोळी, सजावट उत्साहात केली जाते. त्यामुळे नवरात्र काळात गावात संपूर्ण वातावरण शिवमय होते. गावभर भ्रमण करून आजचा पहिला दिवस जुने गाव वरची गल्ली येथील नागरिक, पंच कमिटी यांच्यावतीने पुष्प टाकून भव्य स्वागत करण्यात आले. महाआरती, प्रेरणा मंत्र, ध्येय मंत्र श्रीमद्भगवताच्या श्लोक पठनाने समाप्ती करण्यात आली. तसेच दुर्गामाता दौडच्यावतीने नंदगडमधील लक्ष्मी मंदिर येथे सतत नऊ दिवस सकाळ व सायंकाळी महाआरतीचे आयोजन करण्यात आले आहे.

गर्लगुंजी येथील दौडीत युवक-युवतींचा सहभाग

शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान गर्लगुंजी (ता. खानापूर) यांच्यावतीने गर्लगुंजी येथे नवरात्रीनिमित्त दौडीचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवारी पहिल्या दिवशी दौडीला येथील शिवाजी स्मारकापासून सुरुवात करण्यात आली. पहाटे 5.30 वाजता छत्रपती शिवाजी राजांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले. त्यानंतर गावातील विविध मार्गावरून गावच्या सर्व देवस्थानाना भेट देऊन व देवतांचे पूजन करून दौड माऊलीदेवी मंदिराजवळ आली. तेथे आरती होऊन दौडीची सांगता झाली. या दौडीत युवक, युवतीसह मुलांचाही मोठा सहभाग होता.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article