१ ऑक्टोबरला येणार ‘दुपहिया २’
मागील वर्षी ओटीटीवर दुपहिया वेबसीरिज प्रदर्शित करण्यात आली होती. या वेबसीरिजला प्रेक्षकांची मोठी पसंती मिळाली होती. आता निर्मात्यांकडून ‘दुपहिया सीझन 2’ची घोषणा करण्यात आली असून याचा ट्रेलरही प्रदर्शित करण्यात आला आहे. यावेळी दुपहियाच्या धडकपूर गावात खूप काही नवीन पहायला मिळणार आहे. दुपहिया सीरिजमध्ये धडकपूर गाव दर्शविण्यात आले होते, जेथे आजवर एकही गुन्हा नोंदविण्यात आलेला नाही. परंतु दुपहिया सीझन 2 मध्ये धडकपूर ग्रामपंचायत गुन्हेमुक्त राहणार नाही. याचा अंदाज याचा ट्रेलर पाहून सहजपणे बांधता येतो.
धडकपूर गावातील शेतांमध्ये मोबाइल टॉवर लावण्याची चढाओढ दिसून येत असून याचमुळे गावात एक नवा वाद उभा ठाकला असून तो रोमांचक अन् विनोदाच्या पेरणीने भरपूर आहे. सोनम नायरकडून दिग्दर्शित या सीरिजची निर्मिती सलोना बैंस जोशी आणि शुभ शिवदासानी यांनी केली आहे. या सीरिजची कहाणी अविनाश द्विवेदी आणि चिराग गर्ग यांनी लिहिली आहे. दुपहिया सीझन 2 मध्ये गजराव राव, रेणुका शहाणे, स्पर्श श्रीवास्तव, भुवन अरोडा, शिवानी रघुवंशी, यशपाल शर्मा प्रमुख भूमिकेत दिसून येतील. नव्या सीझनमध्ये भोजपुरी सुपरस्टार दिनेश लाल यादवची एंट्री झाली आहे. दुपहिया सीझन 2 अमेझॉन प्राइम व्हिडिओवर 1 ऑक्टोबरपासून स्ट्रीम करण्यात येणार आहे.