For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मोटारसायकली चोरणाऱ्या जोडगोळीला अटक

06:24 AM Jul 26, 2026 IST | Tarun Bharat Portal
मोटारसायकली चोरणाऱ्या जोडगोळीला अटक
Advertisement

2 लाखाच्या पाच मोटारसायकली जप्त : सदलगा पोलिसांची कारवाई

Advertisement

त. भा. प्रतिनिधी

बेळगाव

Advertisement

मोटारसायकली चोरणाऱ्या दोन तरुणांना अटक करून त्यांच्याजवळून सुमारे 2 लाख रुपये किमतीच्या पाच मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. सदलगा पोलिसांनी ही कारवाई केली असून, जिल्हा पोलीस प्रमुख के. रामराजन यांनी ही माहिती दिली आहे.

सदलगा पोलीस स्थानकात दाखल झालेल्या मोटारसायकल चोरी प्रकरणाचा तपास करताना शुभम राजू मन्नोळे (रा. शमनेवाडी, ता. चिकोडी) व आकाश प्रकाश वडेर (रा. आळते, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) या दोघा जणांना ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी मोटारसायकली चोरल्याची कबुली दिली आहे.

चिकोडीचे पोलीस उपअधीक्षक गोपालकृष्ण गौडर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विश्वनाथ चौगुले, उपनिरीक्षक शिवकुमार बिरादार, प्रशिक्षणार्थी उपनिरीक्षक आय. के. गौडर, वाय. एस. कुळली व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली असून, या जोडगोळीने विविध ठिकाणी चोरलेल्या पाच मोटारसायकली पोलिसांनी जप्त केल्या आहेत.

Advertisement
Tags :

.