For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्या डिजिटल फलकावर शेणफेक

03:14 PM Dec 22, 2023 IST | Kalyani Amanagi
माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्या डिजिटल फलकावर शेणफेक
Advertisement

अक्कलकोट प्रतिनिधी

Advertisement

अक्कलकोट तालुक्यातील कुरनूर धरणात उजनीच्या पाण्याचा श्रेयवाद अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात चांगलाच रंगत आहे. यावरून विद्यमान आमदार सचिन कल्याणशेट्टी व माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांचे पाण्यावरून डिजिटल बॅनरबाजीचा विषय चांगलाच चर्चेत आहे. दरम्यान तालुक्यातील उडगी येथे आज पहाटे माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्या डिजिटल बॅनरवर अज्ञात इसमाने शेण फेक केल्याचा प्रकार उडगी ग्रामस्थांना दिसून आला.

दरम्यान ह्या विटंबनाने काही काँग्रेस प्रेमी व म्हेत्रे समर्थकांनी आक्रमक भूमिका घेत टायर जाळून सदर विटंबनाचा जाहीर निषेध करीत रास्ता रोको सुरू केला. घटनेची माहिती पोलीस पाटील यांनी अक्कलकोट दक्षिण पोलीस स्टेशनला तत्काळ कळवली. त्यानंतर पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने घटनास्थळी धाव घेतली. यावेळी उपस्थित आंदोलकांनी संबंधित अज्ञात इसमावर कडक कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली. त्यावेळी उपस्थित पोलिसांनी आंदोलकांना शांतता राखण्याचे आवाहन करीत कायदा सुव्यवस्था राखण्याचे आवाहन केले. आंदोलकांनी पोलिसांना सहकार्य करत रास्ता रोको आंदोलन मागे घेत वाट मोकळी करून दिली.

Advertisement

उजनी धरणातून तालुक्यातील कुरनुर धरणात पाणी सोडण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केल्याचे दोन्ही आजी-माजी आमदारांच्या समर्थकांचे म्हणणे आहे. गेल्या दहा-पंधरा दिवसांपासून या संदर्भातील डिजिटल बॅनर अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात झळकत आहेत. आठ दिवसांपूर्वी अक्कलकोट शहरात देखील म्हेत्रे यांचे पाणी संदर्भात डिजिटल बॅनरची तोडफोड झाल्याचे समजते. त्यानंतर आज शुक्रवारी पहाटे उडगी येथे म्हेत्रे यांच्या डिजिटल बॅनरवर शेणफेक केल्याचा प्रकार घडल्याने काँग्रेस व म्हेत्रे समर्थकांत संताप व्यक्त झाला. त्याचे परिवर्तन टायर जळत रास्ता रोकोच्या माध्यमातून रूपांतरित झाले.

घडलेल्या घटने संदर्भात तक्रार करण्यासाठी अद्यापही कोणीही आलेले नाही. तक्रार दाखल झाल्यास संबंधित घटनेबाबत लेखी तक्रार आल्यानंतर कारवाई करण्यात येईल. शांतता राखत कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवावी. कोणीही कायदा हातात घेऊ नये, असं पोलीस निरीक्षक महेश स्वामी म्हणाले आहेत.

Advertisement
Tags :

.