For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

चौके येथील अपघातप्रकरणी डंपरचालकाची निर्दोष मुक्तता

12:49 PM Mar 27, 2025 IST | अनुजा कुडतरकर
चौके येथील अपघातप्रकरणी डंपरचालकाची निर्दोष मुक्तता
Advertisement

आरोपीतर्फे ॲड. स्वरुप नारायण पई व अंबरीष गावडे यांनी पाहिले काम

Advertisement

मालवण । प्रतिनिधी

मालवण तालुक्यातील चौके बाजारपेठेमध्ये रस्त्याच्या विरुद्ध बाजूने डंपर बेपर्वाईने मागे आणताना झालेल्या एसटी बसच्या अपघातास कारणीभूत ठरल्याच्या आरोपातून डंपर चालक अंकुश चंद्रकांत चौकेकर (वय 35 ) रा - चौके याची मे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी मालवण यांनी निर्दोष मुक्तता केली. आरोपीतर्फे ॲड. स्वरुप नारायण पई व अंबरीष गावडे यांनी काम पाहिले.

Advertisement

दिनांक 28 नोव्हेंबर २०२३ रोजी चौके बाजारपेठेतुन दुपारी 12.30 च्या दरम्यान मालवण -कणकवली एसटी बस प्रवाशांसहित जात असताना रस्त्याच्या विरुद्ध दिशेला उभा असलेला डंपर चालकाने त्याच्या ताब्यातील डंपर अचानक मागे घेतल्यामुळे एसटी व डंपर यात अपघात झाला. या अपघातात एसटी बसचे पुढील भागाचे नुकसान झाले. तसेच वाहक चालक व प्रवाशांना दुखापती झाल्या होत्या. त्यामुळे एसटी चालकाने मालवण पोलीस ठाण्यात डंपर चालकाने बेपर्वाईने व हयगयीने वाहन चालवून बसच्या अपघातास व मानवी दुखापतीस कारणीभूत झाल्याप्रकरणी भारतीय दंड संहिता कलम 279, 337 व मोटर वाहन कायदा कलम 184 अन्वये तक्रार दाखल केली होती. मालवण पोलिसांनी तपासकाम पूर्ण करून आरोपीविरुद्ध मे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी मालवण यांचे न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. याकामी सरकारपक्षातर्फे एकूण 6 साक्षीदार तपासण्यात आले. सुनावणीअंती तपासकामातील त्रुटी, फिर्यादी व साक्षीदारांच्या जबाबातील विसंगती व आरोपीतर्फे केलेला युक्तीवाद ग्राह्य धरून मे. न्यायालयाने आरोपीची खटल्यातून निर्दोष मुक्तता केली.

Advertisement
Tags :

.