महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

बेकायदा वाळू वाहतूक करणारा डंपर पकडला

04:40 PM Jan 04, 2025 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

दोडामार्ग तहसीलदारांची कारवाई ; १ लाख ८० हजारांचा ठोठावला दंड

Advertisement

दोडामार्ग - वार्ताहर

Advertisement

कुडाळ येथून ओव्हरलोड व बेकायदेशीररित्या गोव्याला वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरला आज दोडामार्ग तहसीलदार अमोल पोवार व त्यांच्या पथकाने ताब्यात घेत १ लाख ८० हजार रुपये दंड ठोठावला आहे.ओव्हरलोड व बेकायदेशीररित्या दोडामार्ग मार्गे गोव्याला मोठ्या प्रमाणात चिरे, खडी वाहतुकीबरोबर वाळू वाहतूकही मोठ्या प्रमाणात केली जाते. आज कुडाळ येथून दोडामार्गमार्गे गोव्याला जिए 09 यू 9731 हा डंपर ओव्हरलोड व बेकायदेशीररित्या वाळू वाहतूक करताना दोडामार्ग बाजारपेठनजीक दोडामार्ग तहसीलदार अमोल पोवार यांना निदर्शनास आला. यावेळी तहसीलदार व त्यांच्या पथकाने ही गाडी ताब्यात घेतली. चौकशी केली असता त्या गाडीत ओव्हरलोड वाळू असल्याचे निदर्शनास आले. यावेळी १ लाख ८० हजार रुपयाचा दंड गाडी मालकाला ठोठावण्यात आल्याचे दोडामार्ग तहसीलदार अमोल पोवार यांनी सांगितले.

Advertisement
Tags :
# tarun bharat sindhudurg # dodamarg #
Next Article