मळेवाड येथे डंपर व दुचाकीत अपघात
11:16 AM Mar 04, 2026 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement
न्हावेली /वार्ताहर
Advertisement
मळेवाड प्राथमिक शाळेजवळ मायनिंग वाहतूक करणारा डंपर व गोव्यात कामानिमित्त जाणारा दुचाकी स्वार यांच्यात धडक होत अपघात झाला.मात्र केवळ दैव बलवत्तर म्हणून या अपघातात दुचाकीवरील दोघे थोडक्यात बचावले.मात्र दुचाकीचे मोठे नुकसान झाले आहे.अधिक माहिती अशी की,चिन्मय रविंद्र पेडणेकर (३६) आणि अन्य एकजण होडावडेवरुन कामानिमित्त गोव्याच्या दिशेने जाताना आज सकाळच्या सुमारास मळेवाड प्राथमिक शाळा जवळील वळणावर मायनिंग वाहतूक करणारा डंपर आणि दुचाकीस्वार यांच्यात जोरदार धडक झाली.यात दुचाकीवरील दोघे जखमी झाले असून केवळ दैवबलवत्तर म्हणून बालबाल बचावले.दोघानांही मळेवाड प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले असून डॉ.विक्रम मस्के यांनी प्राथमिक उपचार करुन अधिक उपचारासाठी सावंतवाडी येथे पाठविण्यात आले आहे.
Advertisement
Advertisement