For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Solapur News | सावळेश्वर टोल नाक्यावर 'धुमस'! कर्नाटकच्या ट्रक चालकांकडून तोडफोड; महामार्गावर तणाव

05:06 PM Mar 25, 2026 IST | NEETA POTDAR
solapur news   सावळेश्वर टोल नाक्यावर  धुमस   कर्नाटकच्या ट्रक चालकांकडून तोडफोड  महामार्गावर तणाव
Advertisement

         सावळेश्वर राड्याने टोल प्रशासनाचा कारभार चव्हाट्यावर

Advertisement

पाटकूल - मोहोळ तालुक्यातील सावळेश्वर टोल नाक्यावर कर्नाटक राज्याची नोंदणीकृत असणाऱ्या ट्रक चालक आणि त्याच्या साथीदारांकडून टोल देण्याच्या कारणावरून झालेल्या वादात टोल नाक्याची तोडफोड करण्यात आली.

यावेळी सावळेश्वर टोल नाका येथे टोल घेण्यावरून कर्नाटक राज्यातील ट्रकचालक आणि टोलकर्मचाऱ्यांमध्ये जोरदार झटापटी झाली. येथे टोल घेताना अज्ञात ट्रक चालकाला मारहाण करून जखमी केल्याचा ट्रक चालकांचा आरोप यावेळी इतर ट्रक चालकांनी केला. त्यामुळे संतापलेल्या ट्रकचालकांनी टोलनाक्यावर हल्ला करत टोल नाक्याची तोडफोड केली. त्यामुळे सोलापूर-पुणे महामार्गावर रस्त्याच्या दुतर्फा वाहतुकीच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या.

Advertisement

सावळेश्वर टोल नाक्यावरील घटनेनंतर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत संबंधित चालकाला उपचारासाठी दवाखान्यात हलवले आणि वाहतूक सुरळीत केली. महामार्ग वाहतुकीसाठी सुरळीतपणे सुरू झाला आहे. सावळेश्वरच नाही तर सोलापूर जिल्यातील बहुतांश टोल नाक्यावर असे चित्र बऱ्याचदा पाहावयास मिळते. टोल नाक्यावरील कर्मचारी हे राजकीय घटकाशी निगडित असल्यामुळे त्यांना शिस्त कोणी लावायची, हा प्रश्न मोठा जटिल बनत चालला आहे.

टोल नाक्यावर बऱ्याचदा कोणी हुज्जत घालू नये म्हणून झुंडशाही आणि गुंड प्रवृत्तीचे कर्मचारी नियुक्त करण्याची प्रथा केवळ सोलापूर जिल्ह्यातच नाही तर संपूर्ण राज्यात आहे. आज अशाच वैतागलेल्या ट्रकचालकाने टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांना मारहाण केल्यानंतर त्याला देखील प्रत्युत्तर दाखल मारहाण झालेचे वृत्त आहे. वास्तविक पाहता अशा घटना टाळता येणे शक्य आहे. मात्र, प्रशासनाला टोल हवाय आणि टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांना हुकुमशाही हवी आहे. आज प्रसंगावधान राखत पोलिसांनी धाव घेतल्यामुळे बऱ्याच अंशी सकारात्मक झाले. मात्र इतर वेळी अशा घटना घडल्यास मोठ्या अप्रिय घटनांना तालुक्याला सामोरे जावे लागेल हे मात्र नक्की.

Advertisement
Tags :

.