‘आय एम गेम’मध्ये दुलकर सलमान
दुलकर सलमानने स्वत:चा नवा चित्रपट ‘आय एम गेम’चे चित्रिकरण पूर्ण केले आहे. दुलकरने एक खास व्हिडिओ शेअर करत याची माहिती दिली आहे. या चित्रपटाद्वारे दुलकर हा पुन्हा एकदा मल्याळी चित्रपटसृष्टीत परतणार आहे. यापूर्वी त्याने ‘किंग ऑफ कोठा’ या 2023 मध्ये प्रदर्शित मल्याळी चित्रपटात काम केले होते. आय एम गेमच्या निर्मात्यांनी शेअर केलेल्या व्हिडिओत दुलकर स्वत:च्या पूर्ण टीमसोबत उत्साहात दिसून येत आहे. दुलकरने पूर्ण टीमला एका मोठ्या परिवाराप्रमाणे ठरविले आहे. ही टीम मागील 11 महिन्यांपासून एकत्र काम करत होती.
आय एम गेम या चित्रपटाचे दिग्दर्शन नाहास हिदायत यांनी केले आहे. त्यांनी यापूर्वी आरडीएक्स यासारखा चित्रपट निर्माण केला आहे. तर याची कहाणी सजीर बाबा, बिलाल मोइदु आणि इस्माइल अबूबकर यांनी मिळून लिहिली आहे. जेक बेजॉय यांचे या चित्रपटाला संगीत लाभले आहे. चित्रपटात जबरदस्त अॅक्शन आणि स्टंटसीन्स आहेत.
आय एम गेम हा चित्रपट 20 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट मल्याळी, तमिळ, तेलगू, हिंदी आणि कन्नड भाषेत पाहता येणार आहे. या चित्रपटात दुलकरसोबत एंटनी वर्गीस, मॅसस्किन, कयादु लोहार, कथिर, पार्थ तिवारी आणि संयुक्ता विश्वनाथन हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत.