दुलीप ट्रॉफी स्पर्धा आजपासून
बेंगळूर-अनंतपूर
प्रतिष्ठित दुलीप ट्रॉफी स्पर्धेने भारतीय क्रिकेटचा 2024-25 देशांतर्गत हंगाम गुऊवार दि. 5 सप्टेंबर रोजी सुरू होईल. चार संघांच्या या स्पर्धेत एकूण सहा सामने होणार आहेत. यामध्ये प्रत्येक संघ एकमेकांविऊद्ध एक सामना खेळणार आहे. बीसीसीआयने यंदा देशांतर्गत खेळाडूंना दुलीप ट्रॉफीमध्ये सहभागी होणे बंधनकारक केले आहे. आता ही स्पर्धा नव्या फॉरमॅटमध्ये होणार आहे. यापूर्वी दुलीप ट्रॉफी ही विभागीय स्पर्धा असायची. आता हा सामना भारत अ, भारत ब, भारत क आणि भारत ड यांच्यात होणार आहे. 22 सप्टेंबर रोजी स्पर्धेचा समारोप होणार आहे.
बांगलादेशविऊद्धच्या महत्त्वाच्या कसोटी मालिकेपूर्वी विराट कोहली, कर्णधार रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह आणि अनुभवी अष्टपैलू रविचंद्रन अश्विन यांना विश्र्रांती देण्यात आली आहे. केएल राहुल, इशान किशन, शुभमन गिल, कुलदीप यादव, यशस्वी जैस्वाल, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, अर्शदीप सिंग आणि ऋषभ पंत यांसारखी अनेक मोठी नावे या मोसमात खेळताना दिसतील. आगामी आंतरराष्ट्रीय कसोटी हंगामासाठी सर्वोत्कृष्ट भारतीय संघ तयार करण्याच्या कल्पनेने ही स्पर्धा नवीन स्वरूपात खेळवली जात आहे.
भारत अ संघाची कमान शुबमन गिलच्या हाती असेल. त्यात केएल राहुल, मयंक अगरवाल आणि ध्रुव जुरेल यांचाही समावेश आहे. भारत ब संघाचे नेतृत्व अनुभवी खेळाडू अभिमन्यू ईश्वरन करणार आहे. इंडिया क चे नेतृत्व ऋतुराज गायकवाड करणार आहे, तर यावषीचा आयपीएल विजेता कर्णधार श्रेयस अय्यर इंडिया ड चे नेतृत्व करेल. मोहम्मद सिराज आणि उमरान मलिक यांना आजारपणामुळे दुलीप ट्रॉफी सामन्यातून बाहेर ठेवण्यात आले आहे. अनुभवी अष्टपैलू रवींद्र जडेजाला बीसीसीआयने कोणतेही कारण न देता रिलीज केले आहे.