For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

दुलीप करंडक सामना रंगतदार स्थितीत

06:50 AM Aug 26, 2026 IST | Tarun Bharat Portal
दुलीप करंडक सामना रंगतदार स्थितीत
Advertisement

वृत्तसंस्था, बेंगळूर

Advertisement

2026 च्या क्रिकेट हंगामातील येथे सुरू असलेल्या दुलीप करंकड क्रिकेट स्पर्धेतील उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात मंगळवारी खेळाच्या तिसऱ्या दिवसाअखेर पश्चिम विभागाचा संघ विजयाच्या उंबरठ्यावर आहे. यासामन्यात पश्चिम विभागाला विजयासाठी 287 धावांचे आव्हान देण्यात आले आणि त्यांनी दुसऱ्या डावात 7 बाद 220 धावा जमविल्या. पश्चिम विभागाला आता विजयासाठी 67 धावांची जरुरी असून त्यांचे तीन गडी खेळावयाचे आहेत.

या सामन्यात उत्तर विभागाने पहिल्या डावात 251 धावा जमविल्यानंतर पश्चिम विभागाने पहिल्या डावात 187 धावा केल्या. उत्तर विभागाने 64 धावांची आघाडी मिळविली. त्यानंतर उत्तर विभागाने 4 बाद 107 या धावसंख्येवरुन मंगळवारी तिसऱ्या दिवशीच्या खेळाला पुढे प्रारंभ केला आणि त्यांचा दुसरा डाव 222 धावांवर आटोपला. आयुष बदोनीने 50, अब्दुल समादने 30, निशांत सिंधूने 44 धावा केल्या. पश्चिम विभागाने मुलानी आणि कोटियान यांनी प्रत्येकी 4 तर मुशीर खानने 2 गडी बाद केले.

Advertisement

पश्चिम विभागाला विजयासाठी 287 धावांचे आव्हान मिळाले. पण मुशीर खान व कर्णधार ऋतुराज गायकवाड यांच्या अर्धशतकांच्या जोरावर पश्चिम विभागाने दुसऱ्या डावात दिवसअखेर 51 षटकांत 7 बाद 220 धावा झळकविल्या. मुशिर खानचे शतक 4 धावांनी हुकले. त्याने 126 चेंडूत 2 षटकार आणि 8 चौकारांसह 96 तर गायकवाडने 7 चौकारांसह 66 धावा जमविल्या. एस. शर्माने 4 चौकारांसह 28 धावा केल्या. उत्तर विभागातर्फे अबिद मुस्ताकने दोन गडी बाद केले. बुधवारी खेळाच्या चौथ्या दिवशी पश्चिम विभागाला विजयासाठी 67 धावांची तर उत्तर विभागाला विजयासाठी 3 गड्यांची जरुरी आहे. यामुळे हा सामना तिसऱ्या दिवसाअखेर रंगतदार स्थितीत पोहोचला आहे.

संक्षिप्त धावफलक: उत्तर विभाग प. डाव 251, पश्चिम विभाग प. डाव 187, उत्तर विभाग दु. डाव 222, पश्चिम विभाग दु. डाव 7 बाद 220 (मुशीर खान 96, गायकवाड 66, एस. शर्मा 28, मुस्ताक 2-56).

Advertisement
Tags :

.