न्यूझीलंड वनडे संघात डफी
वृत्तसंस्था/वेलिंग्टन
द. आफ्रिका आणि पाकिस्तान तसेच न्यूझीलंड यांच्यात होणाऱ्या आगामी वनडे तिरंगी मालिकेसाठी न्यूझीलंड संघाची घोषणा करण्यात आली असून या संघात वेगवान गोलंदाज जेकॉब डफीचे पुनरागमन झाले आहे.
ही तिरंगी मालिका 8 फेब्रुवारीपासून पाकच्या गदापी स्टेडियमवर सुरू होईल. पाक आणि न्यूझीलंड यांच्यात सलामीचा सामना खेळविला जाईल. 10 फेब्रुवारीला न्यूझीलंड आणि द. आफ्रिका यांच्यात सामना होईल. या स्पर्धेतील अंतिम सामना 14 फेब्रुवारीला खेळविला जाईल. पाकमध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स करंडक वनडे क्रिकेट स्पर्धेत न्यूझीलंडचा सलामीचा सामना 19 फेब्रुवारीला गदापी स्टेडियमध्ये पाकबरोबर होणार आहे.
न्यूझीलंड संघ: तिरंगी आणि चॅम्पियन्स स्पर्धेसाठी- मिचेल सॅँटेनर (कर्णधार), ब्रेसवेल, चॅफमन, कॉन्वे, फर्ग्युसन, हेन्री, लॅथम, मिचेल, ओरुरके, फिलीप्स, रचिन रविंद्र, सिरेस, नाथन् स्मिथ, विलियम्सन, यंग, डफी (केवळ तिरंगी मालिकेसाठी)