For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अवेळी पावसामुळे ‘स्मार्ट सिटी’ची कामे रखडणार

10:52 AM Apr 22, 2024 IST | Tarun Bharat Portal
अवेळी पावसामुळे ‘स्मार्ट सिटी’ची कामे रखडणार
Advertisement

पावसाचा स्मार्ट सिटीच्या कामांना फटका : आज इमॅजिन पणजीची महत्त्वाची बैठक

Advertisement

पणजी : शनिवारी सकाळी झालेल्या अवेळी पावसामुळे पणजीतील स्मार्ट सिटी कामांची दुर्दशा झाली असून त्यावर विचार करण्यासाठी इमॅजिन पणजी स्मार्ट सिटीची आज सोमवार दि. 22 रोजी विशेष बैठक आयोजित करण्यात आली आहे. स्मार्ट सिटीच्या कामांसाठी ठरवण्यात आलेली 31 मेची मुदत आता वाढणार असल्याची माहिती इमॅजिन पणजीचे सीईओ संजित रॉड्रिग्स यांनी दिली आहे. त्यामुळे पणजीतील स्मार्ट सिटीची कामे 31 मेपर्यंत संपणार नाहीत उलट ती पुढे काही दिवस चालू ठेवावी लागणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पणजीतील स्मार्ट सिटीच्या कामात पावसाचे पाणी तुंबल्यामुळे अनेक समस्या निर्माण झाल्या असून त्यावर आता नव्याने उपाययोजना करण्याची पाळी स्मार्ट सिटी इमॅजिन पणजी डेव्हलपमेंट कंपनीवर आली आहे. पावसामुळे पणजी शहराची आणि त्यातील स्मार्ट सिटी कामाची जी अवस्था झाली आहे, त्यास सदर कंपनी जबाबदार असल्याची टिप्पणी महापौर रोहित मोन्सेरात यांनी केल्यामुळे पणजी मनपा आणि इमॅजिन पणजी यांच्यात समन्वय नसल्याचे समोर आले आहे. अवेळी पावसाचा फटका स्मार्ट सिटीच्या विविध कामांना बसला असून ती कामे आता ठरवलेल्या वेळेत पूर्ण होणे कठीण बनल्याचे रॉड्रिग्स यांचे म्हणणे आहे. एप्रिलचे काही दिवस आणि पूर्ण मे महिना अजून जायचा असून त्या कालावधीत पुन्हा पाऊस पडू शकतो आणि तो पडला तर स्मार्ट सिटीचे काय होणार? अशी शंका सर्वांना सतावत आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.