मोबाइलवर लावलेला स्टेटस म्हणजे काय असतो रे भावा ?
कसबा बीड / विश्वनाथ मोरे
आजच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक जण आपले मत मांडण्याचा प्रयत्न करत आहे.त्यासाठी सोशल मीडियावरती स्टेटस ठेवणे हे प्रचलित होत आहे.यातून आपले मत मांडत असताना समाजाचा,गावाचा व कुटुंबाचा विचार करणे गरजेचे झाले आहे.
ग्रामीण भाग म्हटलं की सर्वांनी एकत्र येऊन निर्णय घेणे व समाजाला पूरक असणाऱ्या गोष्टीला प्राधान्य देणे हे प्रमुख ग्रामस्थांची कर्तव्य समजले जात होते.आज पर्यंत कोल्हापूर शहर व ग्रामीण भाग हे पुरोगामी शहर व जिल्हा या नावाने प्रख्यात होता.सर्वधर्म समभाव असणारा हा जिल्हा व ग्रामीण भाग कोणत्याही सोशल मीडियाला भीक घालत नव्हता.
पण आता सद्यस्थितीला सोशल मीडिया वरून स्टेटस ठेवणे , धार्मिक तेढ व जातीय निर्माण करून ग्रामीण भागातील एकोप्याला खिंडार पडत आहे का? असे चित्र सद्यस्थितीला दिसत आहे.यामध्ये काही भागांमध्ये अशा प्रकारे स्टेटस च्या नावाने एकोप्याला तडा गेल्याची उदाहरणे आहेत.तोच ट्रेड आता ग्रामीण भागात सुद्धा डोकावत आहे. त्याला पूरक काही अशा घटना देखील घडल्या आहेत. शहरी आणि ग्रामीण भागातील राहणीमान यात फरक आहे. विशेषतः ग्रामीण भागातील एकोपा टिकवणे ही काळाची गरज आहे.
ग्रामीण भागातील कोगे या गावात अशाच प्रकारे स्टेटस च्या माध्यमातून तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. रात्री 8.00 वाजण्याच्या सुमारास अल्पवयीन मुलाने मोबाइलवर स्टेटस लावला होता. तो निमित्त ठरला याचा परिणाम गावातील युवकांनी यावर पुढाकार घेऊन संबंधित युवकाने माफी मागावी यासाठी एकत्र आले. त्यावेळेस कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिस प्रशासनाने बंदोबस्त तैनात केला होता. दोन्ही बाजूच्या युवकांना समोर घेऊन स्टेटस ठेवणाऱ्या युवकाने माफी मागितली व अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. या घटनेतून काही काळ तणाव निर्माण झाला होता.पण सामंजस्याने तोडगा काढण्यात आला. योग्य वेळी पोलीस प्रशासन यांनी ही बाब गांभीर्याने घेत पोलीस पाटील , ग्रामपंचायत प्रशासन व गावातील सुज्ञ नागरिक, युवक व पोलीस प्रशासन या सर्वांच्या सहकार्याने आक्षेपार्य स्टेटसला फाटा देत ग्रामीण भागातील एकोपा टिकवण्याचे केले आहे.
तरुणाईला इतिहास समजणे ही काळाची गरज आहे. त्यासाठी आवश्यक असणारा पुस्तक संग्रह व त्याचे चित्रण व्यतीत करणारा थोर विचारवंत किंवा इतिहासकार यांच्या माध्यमातून इतिहास समजला जात होता, पण आजची तरुणाई व त्यांना मिळालेल्या सोयी सुविधा तसेच हातात ॲनराईड मोबाईल यांच्या माध्यमातून इतिहास शोधण्याचा प्रयत्न करत आहे.यामधून चांगले व वाईट हे निवडणे कठीण होत आहे. त्यामुळे चुकीचा इतिहास किंवा संदेश जाऊ नये यासाठी त्यांना योग्य इतिहास समजून सांगणे व त्या संदर्भात त्यांना साहित्य उपलब्ध करून देणे ही आज काळाची गरज झाली आहे.