कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

वाहने वाढल्याने शहरात वाहतूक कोंडीची समस्या

11:50 AM May 28, 2025 IST | Radhika Patil
Advertisement

कोल्हापूर :

Advertisement

शहरासह जिह्यातील वाढती वाहन संख्या, पर्यटकांचा ओघ याचसोबत शहराचा रखडलेला मास्टर प्लॅन यामुळे शहरातील वाहतूक कोंडीमध्ये दिवसेंदिवस होत आहे. शहरातील बंद असणारे सिग्नल, रस्त्यावरील खड्यांचे प्रमाण यामुळे या वाहतूक कोंडीत भर पडत आहे. महापालिका आणि शहर वाहतूक शाखेने या वाहतूक कोंडीवर कायमस्वरुपी तोडगा काढण्याची मागणी होत असून, पर्यटकांना पुरेशी पार्किंगची व्यवस्था करण्याची गरज आहे.

Advertisement

शहराच्या लोकसंख्येच्या तुलनेत दिवसेंदिवस दुचाकी, चारचाकी व प्रवासी वाहनांची संख्या वाढत आहे. मात्र शहरातील रस्त्यांची संख्या आहे तेवढीच आहे. शहरातील वाहतूकीच्या तुलनेत नवीन रस्ते, जुन्या रस्त्यांचे ऊंदीकरण होणे गरजेचे होते. कोल्हापूरसह शहराचा विस्तार वाढून उपनगरे विस्तारली आहेत. यामुळे दिवसेंदिवस शहराच्या लोकसंख्येमध्ये भर पडली आहे. करवीरनिवासिनी अंबाबाई आणि जोतिबा दर्शनासाठी लाखो भाविक येतात. पर्यटकांची संख्याही लक्षवेधी आहे. त्यामुळे शहरातील वाहतूक नियंत्रण यंत्रणेची जबाबदारी तशी जोखमीचीच. शहरातर्गत सर्वच रस्ते वाहनांच्या गर्दनि फुललेले असताना त्यावर नियंत्रण ठेवताना यंत्रणेला तारेवरची कसरत करावी लागते.

शहरातील सिपीआर चौक, दसरा चौक, क्रशर चौक, माळकर तिकटी, फोर्ड कॉर्नर, कोंडाओळ, उमा टॉकीज हे सिग्नल असून अडचण असल्यासारखे आहेत. या सिग्नलनजीकच केएमटी व एसटीचे थांबे असल्यामुळे वाहतूक कोंडीमध्ये भर पडत आहे. शहरातील 11 सिग्नल नजीक केएमटी व एसटीचे थांबे आहेत. हे थांबे काही अंतरावर शिफ्ट केल्यास वाहतूक कोंडी सुटू शकते.

शहरातील वाहतूक समस्येवर तोडगा काढण्यासाठी पोलीस प्रशासन व महापालीका यांच्यात झालेल्या बैठकीत समन्वय समिती नेमण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र ही समन्वय समिती अद्याप कागदावरच असल्याची माहिती समोर आली आहे. तीन वर्षापूर्वी ही समन्वय समिती नेमण्याचे नियोजन करण्यात आले होते. मात्र याबाबत शहर वाहतूक शाखेने पाठपुरावा करुनही महापालिकेने अद्याप याबाबत कारवाई केलेली नाही.

दसरा चौक येथे मोठा गाजावाजा कऊन उभारण्यात आलेला सिग्नल उद्घाटनानंतर बंदच आहे. सिग्नल सुऊ झाल्यानंतर या सिग्नलच्या परिसरात एक केएमटी व एक एसटीचा स्टॉप असल्याचे शहर वाहतूक शाखेच्या निदर्शनास आले आहे. सिग्नल उभारल्यानंतर हे शहाणपण शहर वाहतूक शाखेस सुचले आहे.

कोल्हापूर, इचलकरंजीसह जिह्यात 18 लाखांवर वाहनांची संख्या आहे. त्यात दुचाकी (13 लाख 11 हजार), चारचाकी मोटार (1 लाख 45 हजार 365), रिक्षा (19 हजार 286), बसेस (2 हजार 721), ट्रक (18 हजार 298) अशा वाहनांच्या नोंदी आहेत. कोल्हापूर शहर वाहतूक शाखेकडे 1 पोलीस निरीक्षक, 1 पोलीस उपनिरीक्षक यासह 80 कर्मचारी आहेत. तर इचलकरंजी वाहतूक शाखेकडे 30 कर्मचारी आहेत. जिह्यातील 18 लाख वाहनांचे नियोजन करण्याची जबाबदारी केवळ 80 कर्मचाऱ्यांवर आहे.

शहरात सकाळी 10 ते 12 आणि सायंकाळी 6 ते 8 या वेळेत वाहतूक कोंडी होत आहे. रंकाळा टॉवर, हॉकी स्टेडियम, क्रशर चौक, शिवाजी पुल, बिंदु चौक, फोर्ड कॉर्नर, रिलायन्स मॉल रोड, लक्ष्मीपुरी, शाहूपुरी, परीख पुल, राजारामपुरी याठिकाणी वाहतूक कोंडी नेहमीची आहे.

दरवर्षी महापालिका रस्त्यावरील खड्डे मुजविण्यासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी खर्च करते. दरवर्षी हा निधी पाण्यासारखा खर्च केला जातो, मात्र रस्त्यावरील खड्डे काही मुजत नाहीत. खड्डे मुजविणारे ठेकेदार नेहमीचेच असतात. रस्त्यांवरील खड्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. खड्यामधून वाट काढत वाहन चालविताना वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. याचाही परिणाम वाहतूक कोंडीवर होत आहे.

- मुख्य मार्गावरील अतिक्रमण काढणे

- मुख्य रस्त्यावरील बेवारस वाहने हटविणे

- शहरात मास्टर प्लॅन नुसार रस्त्यांचे रुंदीकरण करणे

- बंद सिग्नल सुरु करणे

- पार्किंगची ठिकाणे वाढविणे

शहरातील वाहतूक कोंडीबाबत पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांनी सुचना दिल्या आहेत. यानुसार महापालिकेशी संपर्क साधून कारवाई करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात रस्त्यावरील बेवारस आणि बंद स्थितीतील वाहने हटविण्यात येणार आहेत. याचसोबत भाविकांसाठी पार्किंग व्यवस्था उपलब्ध करुन देण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

                                                                                                                        नंदकुमार मेरे, पोलीस निरीक्षक शहर वाहतूक शाखा

Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article