For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

न्यायालयामुळे भोवली डोंगरफोड, साठ लाख रुपयांचा भरावा लागला दंड

10:53 AM Mar 07, 2024 IST | Tarun Bharat Portal
न्यायालयामुळे भोवली डोंगरफोड  साठ लाख रुपयांचा भरावा लागला दंड
Advertisement

पणजी : ताळगाव येथील डोंगरफोडीची जागा पुर्ववत करण्याचे आश्वासन देऊनही एस्टोनियो फ्रान्सिस्को दी आल्मेदा यांच्याकडून कार्यवाही न झाल्याबद्दल उच्च न्यायालयाने कडक कारवाईचा आणि ‘रेंज रोव्हर’ गाडी जप्त करण्याचा इशारा देताच त्याने एकूण 60 लाखांपैकी उर्वरित 35 लाख रक्कमही भरली. त्यामुळे न्यायालयाने उत्तर गोवा पीडीएच्या (एनजीपीडीए) मार्गदर्शनाखाली त्याला डोंगर पुर्ववत करण्यास परवानगी दिली आहे. पणजी मनपाचे माजी महापौर टोनी रॉड्रिगीज यांनी ताळगावात डोंगर कापून भव्य बंगला बांधला जात असल्याची याचिका दाखल केली होती. या याचिकेवरील मागील सुनावणीवेळी फोडलेला डोंगर पुर्ववत करण्यासाठी सुमारे 50 ते 60 लाख ऊपयांचा खर्च येण्याचा अंदाज उत्तर गोवा पीडीएने (एनजीपीडीए) न्यायालयात सादर केला होता. हा सर्व खर्च प्रतिवादी तथा त्या जमिनीचे मालक एस्टोनियो फ्रान्सिस्को दी आल्मेदा यांच्याकडून वसूल करण्याचा आदेश गोवा खंडपीठाने दिला होता. हा आदेश मान्य करून आल्मेदा याने 10 लाख आणि 15 लाख भरले होते.  उर्वरित 35 लाख रक्कम भरण्यास टाळाटाळ केली होती. प्रतिवादींचे वकील साहिल सरदेसाई यांनी सदर रक्कमेसाठी बँकेत धावपळ केली. तरीही ती भरणे शक्य नसल्याची कबुली दिली. मात्र या सबबी चालणार नसल्याचे स्पष्ट करून आल्मेदा यांची महागडी रेंज रोव्हर गाडी जप्त करण्याचा अधिकार असल्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने दिला होता. त्यानंतर आल्मेदा यांनी उर्वरित 35 लाख रक्कम भरली आहे. येत्या तीन महिन्यांत डोंगर पुर्ववत करण्यासाठी ‘एनजीपीडीए’ ला आणि सार्वजनिक बांधकाम खात्याला काम सुऊ करण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. सदर कामाचा अहवाल 22 एप्रिल रोजी न्यायालयाला सादर करण्याचाही आदेश देण्यात आला आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.