For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

निसर्गाच्या अवकृपेने शेतकऱ्यांची ऊस लागवडीकडे पाठ

10:40 AM Feb 20, 2024 IST | Tarun Bharat Portal
निसर्गाच्या अवकृपेने शेतकऱ्यांची ऊस लागवडीकडे पाठ
Advertisement

ऊसतोड टोळ्या परतू लागल्या : तालुक्यातील पश्चिम भागातील हंगाम लवकर संपल्याने कारखानदारांमध्ये चिंता

Advertisement

वार्ताहर /उचगाव

बेळगावचा पश्चिम भाग हा ऊस लागवड आणि ऊस उत्पादनात सातत्याने अग्रेसर आहे. मात्र गेल्या काही वर्षात निसर्गाच्या अवकृपेमुळे आणि येणारी विविध संकटे, कारणे यामुळे ऊस लागवडीत दिवसेंदिवस घट होत असल्याचे चित्र दिसून येते. यावषी ऊस हंगाम अखेर संपल्याने ऊस उत्पादक शेतकरी आणि ऊसतोड करणाऱ्या टोळ्या यांनी ‘सुटलो एकदाचे’ अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. टोळ्या परतू लागल्या असून शेतकरी पुढल्या शेतीकामाच्या हंगामात गुंतल्याचे चित्र सध्या सर्वत्र दिसून येत आहे. चालूवषीचा हंगाम नोव्हेंबरपासून सुरू होऊन फेब्रुवारी महिन्यात ऊस तोडणीचा हंगाम संपत आला. चालूवषी ऊस लागवड क्षेत्र कमी असल्यामुळे ऊस गळीत हंगाम तीन ते चार महिने चालला. चालू वर्षाच्या हंगामात ऊसतोडणी कामगारांचा मोठा तुटवडा निर्माण झाला होता. शिवाय ऊसतोडणी करणाऱ्या टोळ्यादेखील तोडणीसाठी मोठी खुशाली मागत असल्याने शेतकऱ्यांनाही मोठी चिंता लागून राहिली होती. दरवषी लातूर, बीड, उस्मानाबाद आदी भागातून येणाऱ्या काही ऊसतोडणी कामगारांनी यावेळी दांडी मारली होती. या भागातून मोठ्या प्रमाणात ऊसतोडणी करणाऱ्या कामगारांच्या टोळ्या येत असतात. मात्र यावषी त्या अल्प प्रमाणात आल्याने शेतकऱ्यांना मिळेल ती टोळी घेऊन व स्थानिक पातळीवर कामगारांच्या सहकार्यातून ऊसतोडणी आणि कारखान्यापर्यंत तो पोहोचवणे यासाठी बरीच कसरत करावी लागली. ऊसतोडणी कामगारांच्या तुटवड्यामुळे तोडणीलाही थोडा विलंब झाला. मात्र आता जवळपास ही तोडणी अंतिम टप्प्यात असून जवळजवळ ऊस संपल्याचेही चित्र काही भागात दिसून येते.

Advertisement

याबरोबरच अनेक कारखान्यांनी शेतकऱ्यांची बिले अद्याप काही जमा केलेली नाहीत. विलंबाने जमा करण्यास सुऊवात केली आहे. यामुळे शेतकऱ्यांनाही आर्थिक चणचण भासू लागली आहे. बीड, उस्मानाबाद, लातूर या भागातील टोळ्यांना कर्नाटकातील बेळगाव भागात उसाचे प्रमाण कमी असल्याचाही सुगावा लागल्यानेच त्यांनी या भागात येण्यास नापसंती दर्शविली. त्यामुळे उसाची उचल थोडी उशिरा झाली. गेल्या काही वर्षात बेळगाव तालुक्मयातील ऊस महाराष्ट्रातील अनेक कारखाने उचल करत असत. मात्र हलकर्णी येथील साखर कारखान्याने दगा दिला. याबरोबरच जवळपासच्या काही कारखान्यातून म्हणावी तशी वेळेत उचल होत नसल्याने शेतकऱ्यांनी उसाच्या पिकांकडे दुर्लक्ष केले. ऊस लागवडीकडे पाठ फिरवली. परिणामी यामुळे ऊस पिकात सातत्याने घट होत असल्याचेही चित्र दिसून येत आहे. मात्र सध्या बेळगाव तालुक्मयात सीमाभागातीलच काकती येथील मार्कंडेय सहकारी साखर कारखान्यामुळे अनेक शेतकऱ्यांना धीर आल्यासारखा वाटल्याने यावषी पुन्हा थोडी ऊस लागवडीमध्ये सुधारणा झाल्याचेही तालुक्मयात दिसून येत आहे. यापूर्वी प्रत्येक गावातून पंधरा ते वीस गुऱ्हाळ व्यवसाय चालायचे, मात्र अलीकडच्या काळात गुऱ्हाळ व्यवसाय बंद झाले. एक एक गावातून पूर्णत: गुऱ्हाळ व्यवसाय नामशेष झाल्याचेही चित्र आहे. तर काही गावातून हाताच्या बोटावर मोजण्याइतके गुऱ्हाळ व्यवसाय सध्या कार्यरत असल्याचेही चित्र आहे. एकंदरीत पाहता शेतकऱ्यांना मजुरांचा तुटवडा कारखान्याकडून वेळेत न होणारी उसाची उचल अशा अनेक कारणातून आणि निसर्गाची अवकृपा यामुळे शेतकरी ऊस लागवडीकडे दुर्लक्ष करत पाठ फिरवत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

Advertisement
Tags :

.