For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

दुष्काळामुळे समोर आली पाण्यात बुडालेली वस्ती

06:29 AM May 27, 2024 IST | Tarun Bharat Portal
दुष्काळामुळे समोर आली पाण्यात बुडालेली वस्ती
Advertisement

फिलिपाईसमध्ये धरण पडले कोरडे

Advertisement

फिलिपाईन्स सध्या तीव्र उन्हाळ्याला सामोरा जात असून तेथील नद्या कोरड्या पडल्या आहेत. जलस्रोत आटत चालले आहेत. फिलिपाईन्सच्या नुएवा एसिजा प्रांतात पंताबंगन नावाचे ठिकाण आहे, येथे एक मोठे धरण आहे, उन्हाळा अधिक तीव्र असल्याने येथील धरण आटले आहेत. येथील पाणी संपल्याने शतकांपूर्वीची वसाहत समोर आली आहे.

नुएवा एसिजा प्रांतात बहुतांशकरून भातशेती केली जाते, परंतु यंदा उष्णता तीव्र असल्याने पीक हानी झाली असून शेकडो शेतकऱ्यांना याचा फटका बसला आहे. परंतु शतकांपासून पाण्यात बुडालेली वस्ती समोर येताच या शेतकऱ्यांना लाभ होऊ लागला आहे. हे शेतकरी आता टूरिस्ट गाइड ठरले आहेत. या समोर आलेल्या वस्तीत एक जुने चर्च आहे.

Advertisement

ही प्राचीन वस्ती पाण्याबाहेर आल्याचे कळताच ती जाणून पाहण्याचा विचार केला. काही स्थानिक शेतकरी पर्यटकांना धरणादरम्यान असलेल्या प्राचीन वस्तीपर्यंत पोहोचवित असल्याची माहिती 61 वर्षीय निवृत्त नर्स ऑरिया डेलोस सांतोस यांनी दिली आहे.

पूर्वी मी 200 पेसो दर दिनी मासे विकून कमावत होतो. आता पर्यटकांना हा भाग दाखविण्यासाठी 15 ते 1800 पेसो आकारत आहे. याचबरोबर मासे देखील विकतोय. येथे जी पूर्वी वस्ती होती, त्यातील लोकांना 1970 मध्ये अन्य ठिकाणी विस्थापित करण्यात आले होते. त्यानंतर येथे धरण उभारण्यात आल्याचे मच्छिमार नेल्सन डेलेरा यांनी सांगितले आहे.

नुएवा एसिजा प्रांताच्या शेतकऱ्यांसाठी हे धरण अत्यंत आवश्यक आहे. येथूनच आसपासच्या अनेक प्रांतांना सिंचन आणि पेयजल उपलब्ध हेत. सध्या आशियातील अनेक देश तीव्र उष्णतेला सामोरे जात आहेत. यामुळे अनेक शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. फिलिपाईन्सच्या सरकारने लोकांना घरांमध्येच थांबण्याचा सल्ला देत उष्मालाटेपासून सावध राहण्यास सांगितले आहे.

Advertisement
Tags :

.