सिबिलमुळे थांबला कर्जाचा नवा-जुना प्रकार
कोल्हापूर / विद्याधर पिंपळे :
कर्जंदारांची कर्जाची थकबाकी असल्यास, मार्च एंडिंग काळात या कर्जाचे जुने-नवे तथा जुने कर्ज रिन्यू करण्याचा प्रकार यापूर्वी बँक क्षेत्रात होत होता. विशेषत: सहकारी बँकामध्ये असा प्रकार शंभर टक्के होत होता. पण आता वितीय संस्थामध्ये क्रेडिट इन्फर्मेंशन ब्युरो ( सिबिल) सुरू झाल्याने, हा प्रकार आता थांबला आहे. यामुळे बँकांच्या नॉन परफॉर्मिंग असेट (एनपीए) कमी होऊ लागला आहे.
पूर्वी कर्ज घेणाऱ्यांची मोठी संख्या होती. कर्ज घेऊन कर्ज न भरता बुडवण्याचा प्रकार मोठया प्रमाणावर होत होता. एका पेक्षा अधिक बँकामधून कर्ज घेण्याऱ्यांची संख्या मोठी होती. यामुळे अनेक बँकांचा एनपीए वाढून अनेक बँका डबघाईला आल्या. विशेषत: सहकार क्षेत्रातील नागरी बँकांना ‘जुना-नवा’ चा अनुभव आलेला आहे. कोल्हापूर जिल्हयातील अनेक जुन्या व मोठया सहकारी बँका यामुळे बुडाल्या आहेत. यामध्ये कर्जाचे जुने-नवे ,रिन्यूअल करणे असा प्रकार होत होता. मार्च एंडिंगला थकीत कर्जदारांचे कर्ज , ‘फिरवण्या’ चा प्रकार होत होता. बँकांचा एनपीए कमी दाखवण्यासाठी बँक संचालकमंडळ अशा उलाढाली करत होते. यामध्ये राजकीय नेते आघाडीवर होते. जिल्हयातील ज्या बँका बुडाल्या आहेत, याला हे राजकीय नेते कारणीभूत असल्याचे आज ही बोलले जात आहे.
2012 पासून वितीय संस्थामध्ये सिबिल प्रकार सुरू झाला. 2017 मध्ये रिझर्व्हं बँकेने याबाबत आदेश काढला होता. कोणतेही नवीन कर्ज घेण्यासाठी सिबिल स्कोअर महत्वाचा ठरू लागला आहे. तसेच एकापेक्षा अधिक बँकामध्ये कर्ज घेऊन, कर्ज बुडवणे आता अवघड झाले आहे. यामुळे बँकाचा एनपीए ही कमी होऊ लागला आहे. क्रेडिट इन्फर्मेंशन ब्युरो (इंडिया) ही देशातील एक अग्रणी क्रेडिट रेटींग एजन्सी आहे. यामुळे बँका ,वितीय संस्थामध्ये जागरूक्ता आली आहे. कर्ज देण्यापूर्वी पारदर्शकता, विश्वासहर्ता बरोबर सिबिल स्कोअर पाहुनच मंजूरी ह्रा लागली आहे. सिबिल हा 300 ते 900 अशा तीन अंकी असतो. 300 पेक्षा कमी स्कोअर असल्यास, कर्ज मंजूरी रोखली जाते. तर 900 पेक्षा अधिक स्कोअर असल्यास कर्ज मिळण्यास कोणतीच अडचण येत नाही.
- जुने-नवे प्रकारच बंद
थकीत कर्ज वेळेत न भरल्यास ,याचा परिणाम एनपीएवर होत होता. यासाठी बँका कर्ज जुने-नवे करून कर्ज मर्यादा वाढवत असत. पण सिबिल स्कोअरमुळे जुने-नवे प्रकार हा संपुष्टात आला आहे. यामुळे बँकांचा एनपीए कमी होत आहे.
-सुनिल नागांवकर ,चार्टर्ड अकौटंट