दुधगंगा वेदगंगा सह साखर कारखाना निवडणुकीसाठी राधानगरी मतदान केंद्रावर सकाळच्या सत्रात सरासरी 50 टक्के मतदान
राधानगरी प्रतिनिधी
दुधगंगा वेदगंगा(बिद्री) सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी रविवारी दुपारी 12वाजेपर्यंत सरासरी टक्के मतदान झाले. राधानगरी येथील राजश्री शाहू विद्या मंदिर येथे सकाळच्या सत्रामध्ये मतदान केंद्रामध्ये मतदानासाठी तुरळक गर्दी होती.परंतु सकाळी १० नंतर मतदान केंद्रावर गर्दी होऊ लागली होती, या दोन मतदान केंद्रावर राधानगरी सह बनाचीवाडी, फेजीवडे, पडळी, सावर्धन, सो, शिरोली या गावाचा समावेश असून एकूण मतदान संख्या 566 एवढी आहे, गट क्रमांक 1 मध्ये सत्ताधारी आघाडी मधून राजेंद्र मोरे, राजेंद्र पाटील व राजेंद्र भाटळे तर परिवर्तन आघाडीतून ए वाय पाटील, विठ्ठलराव खोराटे व नंदकिशोर सूर्यवंशी हे उमेदवार रिंगणात त्यामुळे चुरशीचे वातावरण निर्माण झाले आहे.
राधानगरी, करवीर,कागल, भुदरगड कार्यक्षेत्र असणाऱ्या या कारखान्याच्या निवडणुकीसाठी राधानगरी तालुक्यात पश्चिम भागात असलेल्या वरील गावातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी सकाळी 12 वाजेपर्यंत पर्यत टक्के 50 टक्के मतदान झाले. सत्ताधारी व विरोधी आघाडीच्या समर्थकांनी मतदारांना ने- आण करण्यासाठी वाहनांची सोय केली होती, तर ऊस उत्पादक सभासदांना व समर्थकांना अल्पोपहार सोय करण्यात आली होती, कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून राधानगरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ईश्वर ओमासे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.