For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

डुकाटीच्या यंदा 8 नव्या गाड्या होणार सादर

06:47 AM Jan 16, 2024 IST | Tarun Bharat Portal
डुकाटीच्या यंदा 8 नव्या गाड्या होणार सादर

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

डुकाटी ही ऑटोमोबाईल क्षेत्रातील कंपनी 2024 सालात भारतीय बाजारात 8 नव्या गाड्या सादर करणार आहे. लक्झरी मोटरसायकल बनविणाऱ्या कंपनीच्या भारतात दोन नव्या शोरुम्स सुरु होणार आहेत.

 कोणत्या दुचाकी आणणार

Advertisement

मल्टीस्ट्राडा व्ही 4 आरएस, डेझर्टएक्स रॅली, पॅनीगेल व्ही 4रेसिंग रेप्लिका, डायवेल फॉर बेंटले, मॉन्स्टर 30 एनिवर्सारियो, पॅनीगेल व्ही 4 एसपी, स्ट्रीट फायटर व्ही 4 लम्बोर्गिनी, एनवर्सारियो 916 या नव्या दुचाकी यंदा भारतीय बाजारात उतरवल्या जातील.

Advertisement

 येथे बुक करा गाडी

लवकरच वेबसाइटवर या गाड्यांच्या किमती स्पष्ट केल्या जाणार आहेत. सध्याला ग्राहकांना ही बुक करायची असेल तर दिल्ली, पुणे, मुंबई, बेंगळूर, चेन्नई, हैदराबाद, कोची, कोलकाता, चंदीगड आणि अहमदाबादमध्ये डुकाटी विक्रेत्यांकडे करता येणार आहे. 2024 च्या पहिल्या तिमाहीत स्ट्रीटफायटर गाडी लाँच केली जाणार आहे.

Advertisement
Tags :
×

.