For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मध्यप्रदेशच्या डावात दुबेचे अर्धशतक

06:43 AM Feb 24, 2024 IST | Tarun Bharat Portal
मध्यप्रदेशच्या डावात दुबेचे अर्धशतक
Advertisement

वृत्तसंस्था/ इंदोर

Advertisement

2024 च्या रणजी क्रिकेट स्पर्धेतील शुक्रवारपासून येथे सुरू झालेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात मध्यप्रदेश संघाने आंध्रविरुद्ध खेळताना पहिल्या डावात 9 बाद 233 धावा जमवल्या. मध्यप्रदेश संघातील यश दुबेने शानदार अर्धशतक (64) झळकवले.

या सामन्यात मध्यप्रदेशने आपल्या पहिल्या डावाला दमदार सुरुवात केली. यश दुबे आणि हिमांशू मंत्री यांनी सलामीच्या गड्यासाठी 123 धावांची शतकी भागीदारी केली. दुबेने 133 चेंडूत 1 षटकार आणि 7 चौकारासह 64 धावा जमवल्या. तर मंत्रीने 97 चेंडूत 1 षटकार आणि 4 चौकारासह 49 धावांचे योगदान दिले. मध्यप्रदेशची यावेळी स्थिती 1 बाद 123 अशी समाधानकारक होती पण त्यानंतर शशिकांत आणि नितीशकुमार रे•ाr यांच्या अचूक गोलंदाजीसमोर मध्यप्रदेशचा डाव कोलमडला. त्यांचे 8 गडी 104 धावात तंबूत परतले. कुमार कार्तिकेय आणि सारांश जैन यांनी आठव्या गड्यासाठी 51 धावांची भागीदारी केली. नितीशकुमार रे•ाrने 50 धावात 3 तर शशिकांतने 37 धावात 4 गडी बाद केले.

Advertisement

संक्षिप्त धावफलक : मध्यप्रदेश प. डाव 81 षटकात 9 बाद 234 (यश दुबे 64, हिमांशू मंत्री 49, सारांश जैन खेळत आहे 41, नितीशकुमार रे•ाr 3-50, शशिकांत 4-37).

Advertisement
Tags :

.