For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

झिम्बाब्वे दौऱ्यात दुबे, जैस्वाल, सॅमसन टीम इंडियात होणार सहभागी

06:10 AM Jul 09, 2024 IST | Tarun Bharat Portal
झिम्बाब्वे दौऱ्यात दुबे  जैस्वाल  सॅमसन टीम इंडियात होणार सहभागी
Advertisement

वृत्तसंस्था/ हरारे

Advertisement

झिम्बाब्वेतील आगामी तीन टी 20 सामन्यासाठी आता भारतीय संघाची निवड करण्यात आली आहे. बीसीसीआयने झिम्बाब्वेतील पहिल्या दोन टी 20 सामन्यांसाठी यापूर्वी संघ निवडला होता. पण आता भारतीय संघात शिवम दुबे, यशस्वी जैस्वाल, संजू सॅमसन या वर्ल्ड कप विजेत्या खेळाडूंची एंट्री झाली आहे. या तीन खेळाडूंच्या समावेशामुळे रियान पराग व ध्रुव जुरेल यांना संघाबाहेर बसावे लागण्याची शक्यता आहे. वर्ल्डकप जिंकल्यानंतर वेस्ट इंडिजमध्ये आलेल्या चक्रीवादळामुळे टीम इंडियाला काही दिवस विंडीजमध्ये मुक्काम करावा लागला. यामुळे भारतीय संघातील खेळाडूंना झिम्बाब्वेमध्ये दाखल होता येत नव्हते. ही गोष्ट जेव्हा बीसीसीआयला समजली तेव्हा त्यांनी झिम्बाब्वेमधील पहिल्या दोन सामन्यांसाठी प्रथम संघ जाहीर केला. यानंतर सोमवारी बीसीसीआयने उर्वरित तीन सामन्यासाठी संघ जाहीर केला आहे. शिवम दुबे, यशस्वी जैस्वाल व संजू सॅमसन या तिघांचा संघात समावेश करण्यात आला आहे. हे तिघेही झिम्बाब्वेमध्ये दाखल झाले आहेत. या तिघांच्या संघातील समावेशामुळे रियान पराग, ध्रुव जुरेल यांना फटका बसण्याची शक्यता आहे.

तिसऱ्या टी 20 सामन्यासाठी संभाव्य भारतीय संघ - शुभमन गिल (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, रिंकू सिंग, यशस्वी जैस्वाल, रियान पराग, अभिषेक शर्मा, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), रवी बिश्नोई, आवेश खान, खलील अहमद, मुकेश कुमार आणि तुषार देशपांडे.

Advertisement

Advertisement
Tags :

.