दुआ लीपाची प्रियकरासोबत एंगेजमेंट
पॉप सॉन्ग्सची क्रेझ लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येते. दुआ लीपा जेव्हा उत्साहाने भरपूर स्वत:ची धमाकेदार परफॉर्मन्स देते, तेव्हा ही क्रेझ दुप्पट होत असते. तीनवेळा ग्रॅमी पुरस्कार जिंकणारी पॉप गायिका दुआ लीपा आता खासगी आयुष्यावरून जगभरात चर्चेत आहे. दुआ लीपाने प्रियकरासोबत एंगेजमेंट केली आहे. तिने काही छायाचित्रे शेअर केली असून यात तिच्या हातात डायमंड रिंग दिसून येत आहे. तिने जोडीदार म्हणून अभिनेता कॅलम टर्नरची निवड केली आहे. दुआ आणि कॅलम हे मागील एक वर्षापासून परस्परांना डेट करत आहेत. कॅलम-दुआ यांच्यासाठी यंदाचा नाताळ खूपच विशेष ठरला आहे. दुआ लीपा आता कॅलमसोबत मिळून एक मोठी पार्टी आयोजित करणार आहे. ही पार्टी लंडन येथे आयोजित होणार आहे. दुआ लीपा ही अलिकडेच स्वत:च्या इंडिया कॉन्सर्टसाठी भारतात आली होती. परफॉर्मन्सपूर्वी दुआ ही प्रियकरासोबत डिनर डेटवर गेली होती. दुआ आणि कॅलम यांना अनेकदा एकत्र पाहिले जाते.