कॅलम टर्नरसोबत दुआ लिपा विवाहबद्ध
पॉप स्टार दुआ लिपा (30 वर्षे) आणि अभिनेता कॅलम टर्नर (36 वर्षे) यांनी लंडनमध्ये एका खासगी सोहळ्यात विवाह केला आहे. या सोहळ्याची छायाचित्रे ऑनलाइन प्लॅटफॉर्म्सवर मोठ्या प्रमाणात शेअर केली जात आहेत. लिपाने विवाहाकरता डॅनियल रोजबेरीकडून डिझाइन करण्यात आलेला ड्रेस परिधान करण्यात आला होता. तर टर्नर हा नेव्ही सूट आणि टायमध्ये दिसून आला.
जवळपास 30-40 मिनिटांपर्यंत चाललेल्या या सोहळ्यात परिवारांचे सदस्य आणि जवळचे मित्रच सामील झाले. हे नवदांपत्य आता पुढील 3 आठवडे इटालियन जल्लोष साजरा करण्यासाठी पूर्णपणे तयार आहे. परंतु सिसिलीच्या पलेर्मोमध्ये होणाऱ्या भव्य सोहळ्यांपूर्वी त्यांनी एक कायदेशीर सोहळ्यात विवाह करण्याचा निर्णय घेतला होता.
सिसिलीमध्ये होणाऱ्या सोहळ्यासाठी हे जोडपे 17 व्या शतकातील ‘विला वालग्वार्नेरा“मध्ये एक विधी पार पडणार आहे. त्यांनी ‘विला इगिया“ हॉटेलमध्ये सुइट्स बुक केले असून तेथून टायरहेनियन समुद्राचे दृश्य दिसून येते. लीपा आणि टर्नर यांनी स्वत:च्या रिलेशनशिपची घोषणा सुमारे 2 वर्षांपूर्वी केली होती. ‘न्यू रुल्स“, ‘डेंट स्टार्ट नाउ“ आणि ‘लेविटेटिंग“ यासारख्या हिट गाण्यांसाठी प्रसिद्ध लिपा ही एक ब्रिटिश गायिका आणि गीतकार आहे. तिने 7 ब्रिट पुरस्कार आणि 3 ग्रॅमी पुरस्कार पटकाविले आहेत.