For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

डीटीएच उद्योगाने 76 लाख ग्राहक गमावले

06:12 AM Aug 21, 2024 IST | Tarun Bharat Portal
डीटीएच उद्योगाने 76 लाख ग्राहक गमावले
Advertisement

तीन वर्षांमधील स्थिती : दूरसंचार नियामक प्राधिकरणाची आकडेवारी

Advertisement

नवी दिल्ली :

मागील 3 वर्षांत, डायरेक्ट टू होम ब्रॉडकास्टिंग म्हणजे डीटीएच उद्योगाने 76 लाख ग्राहक गमावले आहेत. दूरसंचार नियामक प्राधिकरणाच्या ताज्या आकडेवारीनुसार 31 मार्च 2024 पर्यंत, देशात 6.2 कोटी डीटीएच ग्राहक राहिले आहेत, जे 31 मार्च 2021 रोजी 6.96 कोटी होते. याचा अर्थ असा की देशातील डीटीएच ऑपरेटर्स 2021 पासून दरवर्षी 2.5 दशलक्षाहून अधिक ग्राहक गमावत आहेत.

Advertisement

बाजार विश्लेषकांच्या मते, हे देशातील वाढत्या ब्रॉडबँड कनेक्शन आणि ओटीटी प्लॅटफॉर्ममुळे आहे. शिवाय, त्यांच्याशी संबंधित जटिल नियम आहेत, जे प्रसारण क्षेत्राच्या गतिमानतेला बाधा आणत आहेत. डीटीएच ऑपरेटर्सनी त्यांच्या नेटवर्कमध्ये नेटफ्लिक्स आणि अॅमेझॉन प्राईमसारखे स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म जोडल्यानंतर ही घसरण झाली आहे.

टाटा प्ले, भारती एअरटेलच्या मालकीची भारती टेलिमीडिया, डिश टीव्ही आणि सन डायरेक्ट-यांचा एकत्रित महसूल आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये 10 टक्क्यांनी घटून 11,072 कोटी रुपयांवर आला आहे. टाटा प्ले 33 टक्क्यांच्या मार्केट शेअरसह डीटीएच मार्केटमध्ये अव्वल आहे.

डीटीएचची क्रेझ कमी झाली

3 वर्षात इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या 18.76 टक्क्यांनी वाढून 92.40 कोटी झाली आहे. यापैकी 95.7 टक्के मोबाइल वापरकर्ते आहेत. वायफाय, वाय-मॅक्स सारखे स्थिर वायरलेस सदस्य एका वर्षात 40 टक्के कमी झालेत. जून 2023 मध्ये 9.5 लाख, जे 31 मार्च 2024 रोजी 6.7 लाख झाल्याची माहिती आहे.  जिओ सिनेमा आणि डिस्ने हॉटस्टार वरील क्रिकेट सामन्यांचे मोफत स्ट्रीमिंग देखील कमी झाले आहे. डीटीएच प्लॅटफॉर्म ग्राहकांना जोडण्यासाठी मोठ्या क्रीडा स्पर्धांचा वापर करतात. मोफत क्रिकेटमुळे नवीन ग्राहकांना आकर्षित करण्याच्या त्यांच्या क्षमतेवर परिणाम झाला. प्रसार भारतीच्या मालकीच्या डीडी फ्री डिश आणि नेटफ्लिक्स आणि प्राइम व्हिडिओसारख्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर मोठ्या स्पर्धेमुळे ग्राहकांमध्ये घट होत आहे.

Advertisement
Tags :

.