For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

16 वर्षांच्या संगणक साक्षरता कार्याची दखल; कमळे गुरुजी कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट सोलापूर जिल्ह्यात अव्वल; संचालक अभिजीत जवळकोटे यांचा सत्कार

04:14 PM Sep 19, 2026 IST | Tarun Bharat Portal
16 वर्षांच्या संगणक साक्षरता कार्याची दखल  कमळे गुरुजी कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट सोलापूर जिल्ह्यात अव्वल  संचालक अभिजीत जवळकोटे यांचा सत्कार
Advertisement

मंद्रूप : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना संगणक प्रशिक्षण देत गेल्या 16 वर्षांपासून संगणक साक्षरतेचे कार्य करणाऱ्या डी. एस. कमळे गुरुजी कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट, मंद्रूप या संस्थेला ग्रामीण भागातील उपक्रमशील व उत्कृष्ट केंद्र म्हणून सोलापूर जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळाला आहे.

Advertisement

या उल्लेखनीय कामगिरीबद्दल संस्थेचे संचालक अभिजीत जवळकोटे यांचा जिल्हा समाजसेवा मंडळाचे विश्वस्त नागेशजी बिराजदार यांच्या हस्ते शाल, पुष्पगुच्छ आणि माजी राज्यमंत्री कै. दी. शी. कमळे गुरुजी यांची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला.

संस्थेच्या माध्यमातून ग्रामीण विद्यार्थ्यांना MS-CITसह विविध संगणक प्रशिक्षण अभ्यासक्रमांचे प्रशिक्षण दिले जाते. विद्यार्थ्यांना संगणकाचे मूलभूत ज्ञान, डिजिटल कौशल्ये आणि आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती मिळावी, यासाठी विविध उपक्रम सातत्याने राबविले जात आहेत.

Advertisement

या कार्याची दखल घेत अभिजीत जवळकोटे यांना MKCLच्या रोप्य महोत्सवानिमित्त मुंबईतील यशवंतराव चव्हाण सभागृह, नरिमन पॉईंट येथे सहभागी होण्याचा मान मिळाला. यावेळी त्यांनी MKCLचे चीफ मेंटर डॉ. विवेक सावंत, डॉ. अनिल काकोडकर, समीर पांडे यांच्यासह विविध मान्यवरांची भेट घेतली. तसेच ज्येष्ठ संगणकतज्ज्ञ डॉ. विजय भटकर यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले.

या कार्यात उपसंचालक अविनाश जवळकोटे यांचेही सहकार्य लाभत आहे. संस्थेची दुसरी शाखा तपस्वी कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट, निंबर्गी येथे कार्यरत आहे.

यावेळी सहशिक्षक बंदेनवाज शेख, सोमशंकर जवळकोटे, अविनाश जवळकोटे यांच्यासह विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संस्थेच्या या यशाबद्दल विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थांकडून अभिजीत जवळकोटे यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

Advertisement
Tags :

.