For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Maharashtra Weather | राज्यात पुढील दोन दिवस कोरडे हवामान; पण विदर्भाला मिळणार अवकाळी पावसाची साथ

05:44 PM Apr 30, 2026 IST | NEETA POTDAR
maharashtra weather   राज्यात पुढील दोन दिवस कोरडे हवामान  पण विदर्भाला मिळणार अवकाळी पावसाची साथ
Advertisement

                           दोन दिवस कोरडे हवामान; २ मेपासून विदर्भात पावसाची शक्यता

Advertisement

पुणे : राज्यात पुढील दोन दिवसकोरडे हवामान राहणार असून, कोणताही इशारा दिलेला नाही. दरम्यान, २ मे पासून विदर्भात पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. बुधवारी चंद्रपूरमध्ये सर्वाधिक ४५ अंश तर सोलापूरमध्ये ४२.२ अंश तापमान नोंदविण्यात आले.

बुधवारी विदर्भातील अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ मध्ये उष्णतेची लाट होती, तर इतरजिल्क्यांत वादळी पावसाने हजेरी लावली. राज्याच्या इतर भागात हवामान कोरडे होते. २ तसेच ३ मे रोजी विदर्भातील काही जिल्हयांत अवकाळी पावसाचा अंदाज आहे, तर उष्णतेची लाट देखील ओसरणार आहे.

Advertisement

विदर्भ तापलेलाच
विदर्भातील उष्णतेची लाट ओसरणार असली तरी अद्यापही येथील उष्णता कमी होताना दिसत नाही. दोन दिवसांनंतर या भागात पाऊस होणार असल्याने यातून किंचित दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

Advertisement
Tags :

.