महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

रमजानसाठी सुक्यामेव्याला पसंती

10:02 AM Apr 06, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

खारीक, खजूर, बदामाची रेलचेल : मुस्लीम बांधवांकडून खरेदीला जोर

Advertisement

बेळगाव : मुस्लीम बांधवांच्या पवित्र रमजान सणाला प्रारंभ झाला आहे. त्यामुळे बाजारात सुक्यामेव्याची आवक वाढू लागली आहे. विशेषत: खजूर, खारीक, अक्रोड, बदाम, काजू, पिस्ता आदींना पसंती मिळू लागली आहे. खडेबाजार, गणपत गल्ली, नरगुंदकर भावे चौक आदी ठिकाणी विक्री वाढली आहे. बाजारात रमजानमुळे मुस्लीम बांधवांकडून सुक्यामेव्याला मागणी आहे. बेळगावसह गोवा, चंदगड, आजरा, गडहिंग्लज येथूनही ग्राहक दाखल होऊ लागले आहेत. आरोग्याला उत्तम मानल्या जाणाऱ्या सुक्यामेव्याची खरेदी वाढू लागली आहे. त्यामुळे खडेबाजार परिसरात सायंकाळी मुस्लीम बांधवांची वर्दळ दिसून येत आहे. सुक्री, कियान, आजवा आणि कलमी जातीच्या खजुरांनाही पसंती मिळू लागली आहे. गतवर्षी खजुराचा दर प्रतिकिलो 160 ते 1000 रुपयांपर्यंत होता. यंदा तो 200 रुपयांपर्यंत प्रतिकिलो आहे. खारीक 480, बदाम, पिस्ता आणि काजूचे दर अधिक आहेत. यंदा बेदाणे दरात मोठी घट झाली आहे. बाजारात कोल्हापूर आणि सांगली येथून बेदाणे दाखल होऊ लागले आहेत. त्यामुळे त्यांनाही नागरिकांनी पसंती दिली आहे. खारीकही रस्त्यावर विक्री होऊ लागले आहेत. रमजान महिन्यात मुस्लीम बांधव दिवसा उपवास करून सुक्यामेव्यावर अधिक भर देतात. त्यामुळे सुक्यामेव्याची मागणी वाढली आहे. दिवसभर उपवास करून इफ्तारला खजूर खाऊन रोजा सोडला जातो. त्यामुळे महिनाभर सुक्यामेव्याची अधिक खरेदी होते. खजूर आणि इतर पदार्थ आरोग्यासाठी उत्तम आणि औषधी मानले जातात. त्यामुळे वर्षभर त्यांना मागणी असते. मुस्लीम बांधव रमजान महिन्यात उपवासासाठी खजूर-खारीक अन् सुक्यामेव्याला पसंती देतात. याला धार्मिक पार्श्वभूमीही आहे.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article