For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

राधानगरी भूमिअभिलेख कार्यालयाच्या आवारात मद्यपीचा त्रास

01:36 PM Dec 03, 2024 IST | Pooja Marathe
राधानगरी भूमिअभिलेख कार्यालयाच्या आवारात मद्यपीचा त्रास
Drunken Chaos at Radhanagari Land Records Office
Advertisement

कार्यालयाच्या सुरेक्षेबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल
कोल्हापूर

Advertisement

राधानगरी तालुक्यातील जमीन आणि तत्सम पॉपर्टीचे ब्रिटिश काळापासूनचे अभिलेख संग्रहित असणाऱ्या राधानगरी येथील गावठाण हद्दीत उपअधीक्षक भूमिअभिलेखचे कार्यालय असून रात्रीच्या वेळी कार्यालयाच्या आवारात गेटचे कुलूप तोडून या आवारात मद्यपान करून मद्यपी धिंगाणा घालण्याचे प्रकार सुरू आहेत. या मद्यपींनी आत्तापर्यंत कार्यालयाच्या खिडक्यांच्या काचा फोडल्या आहेत. तर कार्यालय परिसरात दारूच्या बाटल्या फोडण्याचे प्रकार होत असल्याचे निदर्शनास आले आहे.  याचा नाहक त्रास कर्मचाऱ्यासह स्थानिक नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. या अनुषंगाने राधानगरी पोलिसात 25 नोव्हेंबर रोजी लेखी तक्रार देऊनही अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही. सुरक्षेच्या दृष्टीने मद्यपीचा बंदोबस्त करावा अशी मागणी उपअधीक्षक समीर खडकवाले यांनी केली आहे

या अर्जात नमूद केले आहे की भूमिअभिलेख कार्यालय हे राधानगरी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असून कार्यालयाच्या सुरक्षेच्या दृष्टीने आठ फूट उंचीचे जाळीदार तारेचे कंपाउंड केलेले आहे, या कार्यालयाच्या सभोवताली मोकळी जागा आहे. या रिकाम्या जागेत पेव्हिंगब्लॉक बसवून या परिसराचे सुशोभीकरण केलेले आहे. सकाळी 10 ते 6 या कार्यालयीन वेळ संपल्यानंतर गेटला कुलूप लावले जाते, मात्र काही मद्यपी रात्रीच्यावेळी गेटचे कुलूप तोडून आत प्रवेश करतात. या जागेचा वापर दारू पिणे ,सिगारेट ओढणे, जुगार खेळणे या कामासाठी करतात. या ठिकाणी मद्यपीच्या त्रासामुळे अभिलेख चोरीस जाणे व आग लागण्याचा दुर्दैवी प्रकार घडल्यास ब्रिटिश काळापासून जतन केलेले किंवा आगीच्या भक्ष्यस्थानी पडण्याचा धोका निर्माण होऊ शकतो, संभाव्य धोका टाळण्यासाठी राधानगरी पोलिसांनी कडक भूमिका घेणे गरजेचे आहे,

Advertisement

Advertisement
Tags :

.