For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मद्यपी बस चालकाला दोन दिवस कैदेची शिक्षा, 10.5 हजारांचा दंड

11:12 AM May 30, 2024 IST | Tarun Bharat Portal
मद्यपी बस चालकाला दोन दिवस कैदेची शिक्षा  10 5 हजारांचा दंड
Advertisement

वेर्णाच्या घटनेनंतर यंत्रणा झाली प्रभावी

Advertisement

मडगाव : मद्य प्राशन करुन प्रवासी बस चालवल्याच्या आरोपावरुन म्हापसा न्यायालयाने कर्नाटकातील एका बसचालकाला दोन दिवसांची कैदेची शिक्षा ठोठावली आहे. ही घटना मंगळवारी कळंगूट परिसरात घडली. प्राप्त माहितीनुसार मद्य प्राशन केल्याच्या आरोपावरुन शिक्षा ठोठावलेल्या या आरोपीचे नाव फझल अहमद फराश असे असून हा आरोपी हावेरी - कर्नाटक येथील आहे. आरोपी जी बस चालवत होता त्या बसमध्ये (जीए-07-एफ-8631) चाचणी केली तेव्हा या बसचालकाने प्रमाणाबाहेर मद्य प्राशन केल्याचे आढळून आल्यानंतर या बसचालकाविरुद्ध पोलिसांनी मोटर वाहन कायद्याच्या 185, 122 तसेच 177 कलमाखाली गुन्हा नोंद केला आणि म्हापसा न्यायालयापुढे त्याला उभे केले. न्यायालयानेही या बसचालकाची स्थिती पाहिली आणि मद्य प्राशन केलेल्या या बसचालकाला दोन दिवस कैदेची शिक्षा आणि 10,500 रुपयांचा दंड ठोठावला. कळंगूट पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक सचिन नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. आरोपी सध्या कोलवाळ येथील मध्यवर्ती कारागृहात असल्याची माहिती पोलिसांनी दिली. न्यायालयाच्या या कारवाईनंतर हा प्रकार म्हणता म्हणता संपूर्ण गोव्यात पसरला. बहुतेक वेळा अशा प्रकरणात न्यायालय दंडात्मक कारवाई करीत व आरोपी लगेच दंडाची कितीही रक्कम भरुन मार्गक्रमण करीत होते. मात्र, प्रस्तुत प्रकरणात दोन दिवस कैदेची शिक्षा ठोठावल्यामुळे मद्यपी बसचालकांवर एक प्रकारे अंकुश बसणार आहे. वेर्णा येथे मद्यपी बसचालकामुळे पाचजणांना मृत्यू आला होता तर चार कामगार गंभीररित्या जखमी झाल्याची घटना ताजी असतानाच न्यायालयाच्या या कारवाईमुळे अशा प्रकारच्या चालकाना धाक बसणार आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.