शिवाजीनगर परिसरात मद्यपींचा स्थानिकांना उपद्रव
पुणे
पुण्यातील शिवाजीनगर- महापालिकेच्या प्रवेशद्वारावर एका वॉईन शॉप मधून मद्य खरेदी करून, मद्यपी तिथेच फुटपाथवर मद्यपान करत बसतात. त्यामुळे परिसरातील स्थानिक नागरिकांना मद्यपींच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहेत. तेथेच रिकामे ग्लास, खाद्यपदार्थांची विक्री केली जाते. वाईनशॉप बाहेर, परिसरात मद्यपान केल्यास राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून कारवाई करावी अशी अपेक्षा स्थानिक नागरिकांची असतानाही, याकडे डोळेझाक केली जाते. सायंकाळी ६ ते१० या वेळेत याठिकाणी जागोजागी मद्यपी मद्यपान करण्यासाठी बसतात.
तसेच याठिकाणी खाद्यपदार्थ देखील मिळतात. महापालिकेच्या प्रवेशद्वारावरच हा सगळा प्रकार खुलेआम सुरु असूनही याविरोधात कोणतीही करवाई केली जात नसल्याने नागरिकांमधून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. राज्य उत्पादन शुल्क विभाग, महानगरपालिका, शहर पोलिसांनी यावरती कारवाई करणे आवश्यक असल्याचे स्थानिक रहिवासी सांगत आहेत.