मद्यपी तरुणांकडून केएमटीवर दगडफेक
कोल्हापूर :
शहरातील व्हिनस कॉर्नर येथे काही मद्यपींनी रस्त्यावर धिंगाणा घालीत, केएमटी बसवर दगडफेक केली. या दगडफेकीत केएमटी बसची समोरील काच फुटली. या प्रकाराने व्हिनस कॉर्नर चौकात काही काळ तणावपूर्ण शांतता निर्माण झाली होती. तसेच वाहतूक विस्कळीत झाली होती.
व्हिनस कॉर्नर चौकालगतच्या बारमध्ये मंगळवारी दुपारी काही तरुण दाऊ पित बसले होते. दाऊची नशा डोक्यात गेल्यानंतर मद्यपी तऊण संबंधीत बार मधून बाहेर येवून, रस्त्यावर धिंगाणा घालण्यास सुऊवात केली. तसेच रस्त्यावऊन येणारी-जाणारी वाहने अडवू लागले. याचदरम्यान मध्यवर्ती बस स्थानककडून बोंद्रेनगराकडे जाणारी केएमटी बस या ठिकाणाहून जात होती. ही बस मद्यपी तरुणांनी अडविली. या बसवर अचानक दगडफेक सुऊ केली. या दगडफेकीत बसची समोरील काच फुटली. बसवर झालेल्या दगडफेकीच्या घटनेची माहिती समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पण पोलिसांची चाहुल लागताच मद्यपीनी घटनास्थळाहून पलायन केले. याबाबत रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंद करण्यात आला नव्हता.