कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

Sangli News: नशेखोर गुंडांकडून हॉटेलची तोडफोड, तलवारी नाचवत दिली खूनाची धमकी

12:46 PM May 28, 2025 IST | Snehal Patil
Advertisement

पाणी बाटली फुकट न दिल्याने धुमाकूळ, वेटरना दिली खुनाची धमकी

Advertisement

सांगली : कॉलेज कॉर्नर परिसरातील हॉटेल अक्षरममध्ये संजयनगर परिसरातील गुंडांनी सोमवारी मध्यरात्री धुडगुस घातला. हॉटेलची तोडफोड करत या गुंडांनी हत्यारे नाचवत दहशत माजवली. त्यांना रोखणाऱ्या वेटर आणि इतर कर्मचाऱ्यांना कोयता आणि तलवारीचा धाक दाखवला.

Advertisement

गुंडाच्या तावडीतून सुटण्यासाठी हॉटेल कर्मचाऱ्यांनी लावलेली लोखंडी शटरही गुंडानी तोडले आहे. पण या प्रकरणाची पोलीस ठाण्यात नेंद झाली नाही. दरम्यान या घटनेची पोलिसांनी गंभीर दखल घेतली असून या नशेखोर गुंडाच्या मुसक्या लवकरच आवळण्यात येतील, असे शहर पोलीस निरीक्षक संजय मोरे यांनी सांगितले.

अक्षरम हॉटेलच्या बारमध्ये येताना या गुंडांनी वेटरला सांगितले आम्हाला बारच्या आतमध्ये बसण्यास जागा करून दे. त्यावेळी वेटरने त्यांना आतमध्ये जागा नाही, तुम्ही येथे बाहेर असणाऱ्या हॉलमध्येच बसा असे सांगितले. याचा या गुंडांना राग आला आणि त्यांनी त्या वेटरला सांगितले 'तू आम्ही कोण हे ओळखत नाहीस' असे सांगत त्याला धक्का दिला.

त्यानंतर त्यांनी दारूची ऑर्डर दिली. पाण्याची बाटली मागितली. या पाण्याच्या बाटलीचा दर लागणार, असे वेटरने सांगितल्यावर या गुंडांना राग आला आणि त्यांनी वेटरला धक्काबुक्की केली. थेट हत्यार काढून हॉटेलचे नुकसान करण्यास सुरुवात केली.

त्यानंतर या वेटरनी हॉटेलचे लोखंडी शटर बंद करण्याचा प्रयत्न केला असता ते शटरही तोडण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर नंग्या तलवारी आणि कोयता दाखवत हे चौघे गुंड निघून गेले. हा प्रकार या हॉटेलमध्ये उपस्थित असणाऱ्या अनेकांनी पाहिला. तसेच हॉटेलच्या मॅनेजरनेही हा प्रकार पाहिल्यानंतर त्यांनी हे हॉटेल बंद करण्याचा प्रयत्न केला.

परंतु त्यानंतर पुन्हा गुंडांनी येवून त्याला धमकी दिली आणि हत्यार नाचवत पुन्हा जोरदार हल्ला चढवत शटरवर हल्ला केला आणि ते चारचाकीतून निघून गेले. दरम्यान याची कोणतीही माहिती पोलिसांना हॉटेल मालकांनी दिली नाही. पण हा व्हीडीओ व्हायरल झाल्यानंतर सांगली शहर पोलिसांनी याचा तपास सुरू केला.

गुंडांनी वापरलेली गाडी आमदाराच्या ताफ्यात

संजयनगरमध्ये राहत असणाऱ्या या गुंडांनी वापरलेली गाडी जिल्ह्यातील एका आमदाराच्या ताफ्यात असते. हा आमदार सांगलीत आल्यानंतर अनेकवेळा ही गाडी त्यांच्याबरोबर असते. या आमदाराच्या पाठबळावरच ही गुंडगिरी करण्यात येते, असे या गुंडाकडून सातत्याने सांगण्यात येते. त्यामुळे या गुंडावर कारवाई होणार का असा खरा सवाल आहे.

गुंडाच्या मुसक्या आवळणार : पोलीस निरीक्षक

या गुंडांनी हॉटेल अक्षरममध्ये जो धुडगुस घातला आहे, त्याचा व्हिडीओ मी पाहिला आहे. त्यामुळे या गुंडाच्या मुसक्या तत्काळ आवळण्यात येणार आहेत. त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. याशिवाय त्यांच्यावर तडीपारीसारखी कारवाई केली जाईल, असे शहर निरीक्षक संजय मोरे यांनी सांगितले.

हे सर्वजण नशेखोर

ज्या गुंडांनी हॉटेल अक्षरममध्ये धुडगुस घालण्यात आला आहे त्यातील अनेक गुंड नशेखोर आहेत. त्यांनी कोणती तरी नशा केली असावी, असा पोलिसांना संशय आहे. तसेच यातील एक गुंड हा ड्रग्जची विक्री करत असल्याचा पोलिसांना संशय आहे. त्यामुळे या नशेखोरांना तत्काळ अटक करण्यात येणार आहे.

Advertisement
Tags :
#Police action#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMediacrime newsSangli Crime newssangli news
Next Article