Kolhapur Crime | कोल्हापुरात मद्यधुंद तरुणीचा भररस्त्यात धिंगाणा; नागरिकांनी पोलिसांच्या दिले ताब्यात
आर. के. नगर चौकात मद्यधुंद तरुणीचा गोंधळ
कोल्हापूर - मद्यधुंद अवस्थेत भररस्त्यात धिंगाणा घालणाऱ्या तरुणीस रविवारी सायंकाळी नागरीकांनी पोलिसांच्या ताब्यात दिले. यावेळी नागरकांना शिव्यांची चाखोली वाहत महिला पोलीस करुन मचाऱ्यास धक्काबुक्की कर्मचाऱ्याच्या घेतल्याची हाताचा चावा घटना रविवारी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास आर. के. नगर चौकात घडली. या प्रकरणी संयोगिता प्रताप शिंदे (वय २५ रा. अंबाई टैंक, रंकाळा) हिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत अधिक माहिती अशी की, रविवारी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास संयोगिता शिंदे मित्रासोबत निघाली होती, यावेळी आर. के. नगर चौकात ती आली असता, तिचा तेथील काही नागरिकांसोबत वाद झाला. नागरिकांना तिने अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत मारहाण करण्याची धमकी दिली. नागरिकांनी याची माहिती ११२ ला दिली. यानुसार करवीर पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी संयोगिताला ताब्यात घेऊन आर. के. नगर पोलीस चौकीत नेले. या ठिकाणीही संयोगिताने गोंधळ घालत धिंगाण करण्यास सुरुवात केली.
पोलीस कर्मचाऱ्यांनाही अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. मी. पोलिसांच्या तावडीतून पळून जाणार असे म्हणत पोलीस स्टेशनच्या बाहेर पडण्यास सुरुवात केली. पोलीस हेडकॉन्स्टेबल रुबिना खुदबुद्दीन पटेल यांनी संयोगिताला थांबविण्याचा प्रयत्न केला यावेळी संयोगिताने खुदबुद्दीन यांच्या डाव्या हाताचा चावा घेतला, तसेच डोळ्याखाली नखाने ओरबडले. तसेच पटेल यांची गळपट्टी पकडून शिवीगाळ केली. या प्रकरणी रविवारी रात्री करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास करवीर पोलीस करत आहेत.