For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Kolhapur News | 'गोकुळ'मध्ये ढोल-ताशांचा गजर! प्रशासकांच्या स्वागतासाठी उत्पादकांचा जल्लोष

11:40 AM May 06, 2026 IST | NEETA POTDAR
kolhapur news    गोकुळ मध्ये ढोल ताशांचा गजर  प्रशासकांच्या स्वागतासाठी उत्पादकांचा जल्लोष
Advertisement

               गोकुळ दूध संघावर प्रशासक

Advertisement

कोल्हापूर: गोकुळ दूध संघाच्या गोकुळशिरगाव येथील कार्यालयासमोर समोर मंगळवारी दुपारी ढोल ताशांचा गजर घुमला. प्रशासक नियुक्तीत महत्वपूर्ण भूमिका निभावलेले वडकशिवाले आजरा येथील प्रकाश बेलवाडे यांच्या नेतृत्वाखाली उत्पादक शेतकऱ्यांनी प्रशासक आल्याचा आनंद दणदणाट करून व्यक्त केला.

यानंतर प्रशासक मंडळाची भेट घेऊन गेल्या पाच वर्षात कारभाऱ्यांनी जे दरोडे टाकले, तो पैसा परत आणून द्या आणि कारवाई सुरू करा अशी मागणी केली. सोमवारी दुपारी गोकुळ दुध संघावर प्रशासकीय मंडळाची नियुक्ती झाल्यानंतर नूतन प्रशासकांच्या स्वागतासाठी गोकुळ शिरगाव येथील कार्यालयात गर्दीचा ओघ वाढू लागला आहे.

Advertisement

मंगळवारी दुपारी याचिकाकर्ते प्रकाश बेलवाडे यांच्या नेतृत्वाखाली आजरा, गडहिग्लज, चंदगड, करवीर, पन्हाळा येथील उत्पादक शेतकऱ्यांनी संघासमोरच वाद्यांचा दणदणाट करून प्रशासकांचे स्वागत केले. निमित्त जरी स्वागताचे असले तरी यानिमित्ताने प्रशासकांची भेट घेउन त्यांच्या मागील पाच वर्षातील कारभाराविषयी तक्रारी त्यांच्या कानावर घालणे हा उद्देश होता. बैठकीत मागील पाच वर्षातील कामाची चौकशी करा अशी मागणी केली. प्रशासकीय घडी व्यवस्थित बसवण्यासाठी थोडा अवधी द्यावा असे प्रशासकीय मंडळाने सांगितले.

पारदर्शक कारभारासाठी गोकुळवर प्रशासक
बेलवाडे यांनी मागील पाच वर्षातील कामकाजाची एसआयटी चौकशी करावी असे सुचवले, मुश्रीफ यांच्यासह ज्येष्ठ संचालकांवर इडीची कारवाई करण्याबाबत आपण सर्वतोपरी सहकार्य करू अशी ग्वाही दिली, पारदर्शक कारभारासाठी गोकुळवर प्रशासक आले आहे, हा आनंदाचा दिवस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे आल्याचे बेलवाडे यांनी सांगितले.

Advertisement
Tags :

.