9.2 कोटींचे ड्रग्ज आसाममध्ये जप्त
06:21 AM Jan 31, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
वृत्तसंस्था/ गुवाहाटी
Advertisement
आसामच्या दोन जिह्यांमधून 9.2 कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त करण्यात आले आहेत. या जप्तीप्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आल्याचे आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी इंस्टाग्रामवर पोस्टमध्ये म्हटले आहे. जिह्यातील बिजनी येथे 4.5 कोटी रुपयांच्या बंदी असलेल्या याबा टॅब्लेट जप्त करण्यात आल्यानंतर दोन जणांना अटक करण्यात आली. याबा टॅब्लेट हे मेथाम्फेटामाइन आणि कॅफिनचे मिश्रण असलेले अत्यंत व्यसनकारक औषध आहे. तसेच पोलिसांनी अन्य एका कारवाईत काचार जिह्यात एका तस्कराकडून 4.7 कोटी रुपयांचे 947 ग्रॅम हेरॉइन जप्त केले.
Advertisement
Advertisement