बेंगळूर विमानतळावर 38.4 कोटींचे ड्रग्ज जप्त
06:22 AM Mar 20, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
घाना देशातील महिलेला अटक : डीआरआयची कारवाई
Advertisement
प्रतिनिधी/ बेंगळूर
दुबईतून सोने तस्करी प्रकरणी कारवाई केलेल्या महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) आता अमली पदार्थांच्या तस्करीविरुद्ध कारवाई केली आहे. बेंगळूरच्या देवनहळळ येथील केंपेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर 38.4 कोटी रुपये किमतीचे ड्रग्ज जप्त करण्यात आले आहेत. या प्रकरणी डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी घाना देशाच्या महिलेला अटक केली आहे.
Advertisement
कतारच्या दोहा येथून बेंगळूरला आलेल्या मुळच्या घाना येथील जेनिफर अॅबे या महिला प्रवाशाची डीआरआय अधिकाऱ्यांनी विमानतळावर तपासणी केली. यावेळी तिच्याजवळ 3.2 किलो कोकेन आढळून आले. तिला ताब्यात घेऊन चौकशी केली जात आहे. तिच्याजवळ आढळून आलेल्या कोकेनची किंमत 38.4 कोटी रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे. सदर ड्रग्ज कोणाला पुरविण्यात येत होते, याचा तपास केला जात आहे.
Advertisement