महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

मोरजीत एक कोटीचे ड्रग्ज जप्त

10:43 AM Dec 16, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

गोव्यातील सर्वात मोठी कारवाई : रशियन संशयिताला अटक

Advertisement

पणजी : अमलीपदार्थ विरोधी विभागाने (एएनसी) या वर्षातील सर्वांत मोठा ड्रग्जचा साठा जप्त केला आहे. मोरजी येथे कारवाई कऊन 1 कोटी 75 हजार ऊपये किमंतीचे विविध प्रकारचे ड्रग्ज जप्त केले आहेत. या प्रकरणात एका रशियन नागरिकाला अटक असून त्याच्या विरोधात एनडीपीएस कायद्याखाली गुन्हा नोंद केला आहे. मोरजी येथे ड्रग्सचा व्यवहार होणार असल्याच्या खात्रीलायक माहितीच्या आधारे अमलीपदार्थ विरोधी विभागाने ही कारवाई केली. एएनसी गुप्तहेरांनी गेल्या अनेक आठवड्यांपासून सावधपणे पाळत ठेवलेला संशयित मोरजी येथे आला असता त्याला सापळा रचून शिताफिने रंगेहात अटक करण्यात आली. त्याच्याकडून उच्च दर्जाचे 2 किलो डायडपोनिक्रो व्हीड, 1.2 किलो चरस व 15 ग्रॅम एलएसडी द्रव्य मिळून 1 कोटी 75 हजार ऊपयांचे ड्रग्ज जप्त करण्यात आले. रशियन नागरिकाने हा अमलीपदार्थांचा प्रचंड साठा आणला होता. राज्यात पर्यटन हंगाम सुऊ झाला असून विविध ठिकाणी पार्ट्यांचे आयोजन केले जाणार असल्याची माहिती त्याला मिळाली होती. पार्टी होणार असलेल्या भागात ड्रग्ज वितरित करण्याचा त्याचा हेतू होता. एवढ्या मोठ्या प्रमाणात अंमलीपदार्थांचा साठा कसा आणला याचा शोध घेण्याचा प्रयत्न पोलिस करत आहेत.

Advertisement

क्रिप्टो करन्सीद्वारे व्यवहार

क्रिप्टो करन्सीद्वारे पैसे दिले जात असावेत, असा संशय आहे. त्याचे आणखी कुणाशी संबंध आहेत का, याचा तपासही पोलिस करत आहेत. मारेजी हा किनारी भाग असून या ठिकाणी अनेक देशविदेशी पर्यटक येतात. त्यातच डिसेंबरमध्ये नाताळ व नववर्षानिमित पर्यटकांची संख्या बरीच वाढली आहे. त्यामुळे असे ड्रग्ज विक्रेते या भागात फिरत असतात, त्यांचाही शोध घेतला जाईल, असे पोलिसांनी सांगितले. एएनसी उपनिरीक्षक प्रियंका गारोडी यांच्या नेतृत्वाखाली हवालदार  उमेश देसाई, कॉन्स्टेबल नितेश मुळगावकर, संदेश वळवईकर, मंदार नाईक, अमित साळुंके, मकरंद घाडी, योगेश मडगावकर, लक्ष्मण म्हामल, पोलिस चालक कुंदन पाटेकर आणि लेडी कॉन्स्टेबल वेल्सिया फर्नांडिस होते. हा छापा एएनसी निरीक्षक सजीथ पिल्लई यांच्या नेतृत्वाखाली मारण्यात आला. संपूर्ण कारवाईचे एएनसी अधीक्षक बोसुएट सिल्वा यांनी बारकाईने निरीक्षण केले. या प्रकरणाचा अधिक तपास एएनसी उपनिरीक्षक प्रवीण सिमेपुऊषकर करत आहेत.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article