350 कोटींचे ड्रग्ज गुजरातमध्ये जप्त; मासेमारीच्या बोटीतून हेरॉईनची तस्करी
वृत्तसंस्था/ सौराष्ट्र
गुजरातमधील वेरावळ बंदरात पोलिसांनी 350 कोटी ऊपयांच्या 50 किलो हेरॉईनच्या साठ्यासह नऊ जणांना ताब्यात घेतले आहे. तपासादरम्यान या ड्रग्जचे पाकिस्तान आणि इराणशी संबंध असल्याची माहिती उघड झाली आहे. वेरावळ बंदरात ड्रग्जची मोठी खेप उतरवली जाणार असल्याची माहिती गिर सोमनाथचे एसपी मनोहर सिंग जडेजा यांना मिळाली होती. त्यानंतर गुरुवारी रात्री उशिरा वेरावळ बंदरातून 350 कोटी ऊपयांचे 50 किलो हेरॉईनची खेप जप्त करण्यात आली. एका मासेमारी बोटीमधून ड्रग्ज आल्याची माहिती मिळाल्यानंतर छापा टाकण्यात आला. या कारवाईदरम्यान सुरुवातीला जामनगरमधील दोघांना अटक करण्यात आली. त्यांच्या चौकशीतून अन्य सात जणांवरही कारवाई करण्यात आली.
गुजरातमधील समुद्रकिनारे ड्रग्ज माफियांचा अ•ा बनत असल्याचे पुन्हा एकदा दिसून आले आहे. गुजरातचा किनारा अमली पदार्थांच्या तस्करांसाठी सॉफ्ट लँडिंग पॉइंट ठरत असून गेल्यावषी 6500 कोटी ऊपयांचे ड्रग्ज आणि हेरॉईन जप्त करण्यात आले होते. यापूर्वी दक्षिण गुजरातमधील कच्छ, जामनगर, द्वारका जिल्हा आणि मुंद्रा बंदरातून मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ जप्त करण्यात आले होते.